गावगाथा

ठळक बातम्या

Admin

ऑस्ट्रेलियन संस्कृतीतही रुजली आहे स्वामी भक्ती – विजयसिंह शिंदे अनिवासी भारतीयांच्या स्वामीभक्तीने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना...
वाढदिवसाच्या दिवशी आपण जीवेत ‘शरद:’ शतम् असे का म्हणतो माहितीय? जाणून घ्या! ज्येष्ठ व्यक्तींना...
सोलापूर होणार गणवेशाचे जागतिक केंद्र सोलापूरला बनविण्याचे प्रयत्न सोलापूर हे गणवेषनिर्मितीचे मोठे केंद्र व्हावे,...
श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक...

श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक कापून साजरा झाला दत्त जन्मोत्सव सोहळा पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाची सेवा (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/१२/२२) – श्री दत्त जयंती निमीत्त पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण करण्यात आला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरूवारी पहाटे काकड आरतीनंतर मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेंच्या हस्ते हा केक कापून श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री दत्तात्रय महाराज असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा हा नेहमीच मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने साजरा होत असतो. भाविकही या सोहळ्यामध्ये मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. या पाश्वभुमीवर आज पुणे येथील स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धेपोटी आज त्यांनी १५१ किलोचा केक आणून श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलं आहे. त्यानिमित्ताने आज हा केक कापण्याच्या सेवेची संधी मंदिर समितीचा प्रमुख या नात्याने आपणास मिळाली मिळाली आहे. हा केक कापून सर्व स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यावेळी श्री वटवृक्ष महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य, स्वामीभक्त तम्मा भिमपूरे, सुधीर माळशेट्टी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, रामचंद्र समाणे आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात १५१ किलोचा केक कापताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त १५१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते केक...