गावगाथा

ठळक बातम्या

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात

मैंदर्गी, अक्कलकोट
मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अंजली बाजारामठ यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. जयकुमारजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेत बोलताना मंत्री गोरे यांनी मैंदर्गी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजना व संकल्पनांची माहिती नागरिकांना दिली. भाजपा-महायुती सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी नगरपरिषदेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. स्थानिक पातळीवर अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेत त्या सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सक्षम, विकासाभिमुख तसेच उत्तरदायी नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. अब्दुलगनी घुडूभाई बाबुडे, चौडाबाई इराप्पा दुर्गी, कावेरी खाजप्पा पुजारी, श्री. भीमाशंकर सिद्धलिंग पुजारी, श्री. शिवचलप्पा न्यामणप्पा मुनोळी, रोहिणी रामचंद्र निंबाळ, मनीषा वसंत आरेनवरु, श्री. विजयकुमार शिवचलप्पा पोतेनवरु, श्री. वीरेश सिद्धेश्वर भंगरगी, गौरम्मा बसवणप्पा गुंडद, श्री. लाडलेसाब अल्लाबक्ष लुकडे, रेशमा इब्राहीम उस्ताद, श्री. मूतण्णा आडवेप्पा करजगी, सपना संजय मोरे, श्री. तिपण्णा सातप्पा नगणसुर, सुरेखा बसवराज होळ्ळीकट्टी, श्री. काशीनाथ देवप्पा जकापुरे, शिवम्मा लक्ष्मण बमनळ्ळी, श्री. सुरेश विठ्ठल नागुर यांच्यासह सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय श्री. शहाजी पवार, श्री. मोतीराम राठोड, श्री. अनिल पाटील, श्री. संजय मोरे, श्री. विश्वनाथ नागुर, श्री. प्रदीप पाटील, श्री. दयानंद बमनल्ली, श्री. अयुब लुकडे, श्री. राजशेखर मसुती, श्री. शिवशरण बर्मा, श्री. अशोक लोहार, श्री. अयुब नाईकवाडी, श्री. शब्बीर बांग्गी, श्री. बसण्णा कोळी, श्री. सिद्धाराम जमादार, श्री. सिद्धाराम जंगी, श्री. शिवा आलुर, श्री. भीमा गाडीवडार, श्री. शरण गाडीवडार, श्री. कृष्णा निंबाळ, श्री. शिवानंद दिवटे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येतील उपस्थिती सभेला उत्साहवर्धक ठरली.