यशवंतराव चव्हाण यांचे कृषी,उद्योग व सहकार क्षेत्रातील कार्य वंदनीय — मल्लिनाथ कल्याणशेट्टी
मुक्त विद्यापीठाच्या वतीने पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट :
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून सहकार, कृषी व औद्योगिक क्षेत्रात दिलेले योगदान वंदनीय आहे. त्यामुळे त्यांचे कार्य राज्यातील जनता कधीही विसरणार नाही. असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कालिदास वळसंगे, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य नागरिक यांना न्याय दिला. त्यामुळे राज्याची चौफेर प्रगती झाली ते विद्या व कलेचे उपासक होते. अफाट विद्वत्ता व नम्रता त्यांच्याकडे होती. त्यांचा समाजसेवक ते साहित्यिक असा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.
प्रारंभी यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज कामाठी यांनी केले, सूत्रसंचलन सरोजनी हारकुड यांनी केले तर आभार शरणय्या मसुती यांनी मानले. कार्यक्रमास प्रा शिल्पा धूमशेट्टी, शितल फुटाणे उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
मुक्त विद्यापीठ ज्ञानदानात अग्रेसर
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कार्यरत असलेले मुक्त विद्यापीठ ज्ञानदानात अग्रेसर आहे, पदवी व पदव्युत्तर विषयाचे शिक्षण विद्यापीठा मार्फत दिले जाते, त्यामुळे शिक्षणापासून वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत असे गौरवोद्गार देखील मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी काढले.
फोटो ओळ
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
More Stories
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात
हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
संविधानामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल — मल्लिनाथ कल्याणशेट्टी