संविधानामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल — मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट :
देशाचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य मध्ये रूपांतर झाले असून आता विकसित भारताचे स्वप्न साकार करावयाचे आहे. त्यासाठी डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्वे आधारभूत ठरतील असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक ओंकार पाटील, बसवराज बंडगर, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानामुळे देशातील नागरिकांना सामाजिक, राजनैतिक, आर्थिक हक्क मिळाले आहे, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, जाती धर्मामधील दरी कमी झाली आहे, त्यामुळे दरडोई आर्थिक उत्पन्न वाढले आहे, हीच खरी संविधानाची ताकद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे त्यांनी केले तर आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले. कार्यक्रमास प्रा डॉ बाळासाहेब पाटील, हर्षदा गायकवाड, शिल्पा धूमशेट्टी, शितल फुटाणे व भीम सोनकांबळे उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर समाज परिवर्तनास गती मिळाली..
संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिल्यामुळे समाजाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, समाज परिवर्तनास गती मिळाली, आज झालेली चौफेर प्रगती हे विकसित समाजाचे लक्षण आहे असे प्रतिपादन प्रा सौरभ भस्मे यांनी केले.
भारतीय घटनेमधून डॉ आंबेडकर यांच्या विद्वत्तेचे दर्शन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित,उपेक्षित पददलित, अस्पृश्य समाजाच्या वेदना अनुभवल्या होत्या म्हणून भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी वंचित समाजाला हक्क मिळवून दिले. म्हणून संविधान सर्वार्थाने परिपूर्ण आहे, आणि त्यातून त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन घडते, असे मत आपल्या भाषणातून प्रा मधुबाला लोणारी यांनी व्यक्त केले.
फोटो ओळ कल्याणशेट्टी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी उद्योजक ओंकार पाटील व मान्यवर
More Stories
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात
हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
यशवंतराव चव्हाण यांचे कृषी,उद्योग व सहकार क्षेत्रातील कार्य वंदनीय — मल्लिनाथ कल्याणशेट्टी