गावगाथा

ठळक बातम्या

मैंदर्गी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

मैंदर्गी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी कन्नड शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या दोन दिवसीय बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, मैंदर्गी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीने स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.

दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात लंगडी, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, १०० आणि २०० मीटर धावण्याच्या विविध स्पर्धांचा समावेश होता. मैंदर्गी, हत्तीकणबस, शिरवळ आणि कर्जळा केंद्राचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धेनंतर गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे व विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या हस्ते तालुका स्तरावर निवड झालेल्या विजेत्या संघांचा आणि वैयक्तिक खेळाडूंचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही करण्यात आले.


लक्षणीय कामगिरी

लहान गट – मुले :

  • कबड्डी – शिरवळ मराठी शाळा
  • लंगडी व खो-खो – मैंदर्गी कन्नड मुलांची शाळा
  • १०० मीटर धावणेसोमनाथ हसरमनी, मैंदर्गी कन्नड शाळा (प्रथम)
  • २०० मीटर व बुद्धिबळयश बंदिचोडे, इब्राहिमपूर मराठी शाळा

लहान गट – मुली :

  • कबड्डी, लंगडी, खो-खो – मराठी शाळा सांगोगी (ब)
  • १०० मीटर धावणेसाक्षी रेवुरे, इब्राहिमपूर मराठी शाळा
  • बुद्धिबळलक्ष्मी माळी, साफळे मराठी शाळा

मोठा गट – मुले :

  • लंगडी – कन्नड शाळा नागोरे
  • कबड्डी – मराठी शाळा दहिटणेवाडी
  • खो-खो – मराठी शाळा हालहळी
  • १०० मीटर धावणेगणेश बिराजदार
  • २०० मीटर धावणेइरेश बिराजदार
  • बुद्धिबळआनंद बंदिछोडे

मोठा गट – मुली :

  • लंगडी – कन्नड शाळा सलगर
  • कबड्डी – मराठी शाळा तळेवाड
  • खो-खो – मराठी शाळा हत्तीकणबस
  • १०० मीटर व २०० मीटर धावणेचौंडेश्वरी कोळीचौडरशावरी कोळी
  • बुद्धिबळवैष्णवी घंटे

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख देविदास वागमोडे, महादेवा पाटील, अंबाराया उजनी, शिवानंद गोगाव, तसेच शिक्षक सैदप्पा कोळी, सदाशिव कोळी, अरुण पांचाळ यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या विजेत्या विद्यार्थ्यांची आता तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी डिसेंबरमध्ये निवड झाली आहे.


फोटो कॅप्शन :
मैंदर्गी कन्नड शाळेच्या मैदानावर झालेल्या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे व विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रप्रमुख देविदास वागमोडे, महादेव पाटील, अंबाराया उजनी, शिवानंद गोगाव यांसह शिक्षक उपस्थित होते.

मैंदर्गी कन्नड मुलांची शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल हडलगी, मुलींची शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव कोळी सुशीला स्वामी संगीता राठोड रूपाली अल्लोळी अश्विनी संपरगी उपस्थित होते