गावगाथा

ठळक बातम्या

जि.प .खैराट शाळेत संविधान दिन साजरा

जि.प .खैराट शाळेत संविधान दिन साजरा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) संविधान दिन व 26/11 च्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना आदरांजली घेण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेरोजा नदाफ होत्या .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन सचिन होणारी यांनी केले .संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यानी माहिती सांगितली .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना लिहुन पूर्ण केली आणि ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीक्रूत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पित केली .संविधान हा भारताचा प्राण आहे .आज आपला भारत देश डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर चालतो .संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली .संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी अनेक चर्चा आणि सुधारणांनंतर संविधानाचा स्वीकार केला होता याच कारणांमुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करतात .संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले .या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ .बाबासाहेब आंबेडकर होते असे माहिती सांगताना रेखा सोनकवडे म्हणाल्या . संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्याच्या उद्देशाने अंगीक्रुत केले आहे .संविधानाने सर्व व्यक्तींना मुलभूत अधिकार दिले आहेत .संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे देवतूल्य व्यक्तिमत्व असेही रेखा सोनकवडे म्हणाल्या . संविधानाचे महत्व आणि त्याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे .देशात पहिल्यांदा संविधान दिवस 19 नोव्हेंबर 2015 मधे साजरा करण्यात आला होता . संविधान लिहिणाऱ्या सदस्याची संख्या 299 होती .भारत देशाला संविधान एक मोठी देणं आहे त्यावरच आपला देशाचा कारभार चालतो असे माहिती देताना वाळूशंकर रजपुत म्हणाले .26/11 च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले .मुम्बई राजधानीत बॉम्बस्फोट घडवुन आणला त्यात कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी शहीद झाले .नागरिक मरण पावले त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली .देश त्यांनी दिलेले बलिदान कधीच विसरू शकत नाही असे माहिती देताना सुनील होनारे यांनी सांगितले .शाळेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली . संविधान दिनानिमित्य विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या .चित्रकला स्पर्धेत शुभांगी जमादार अशोका कुरणे दिव्या मायाचारी यांनी क्रमांक मिळविला निबंध स्पर्धेत गौरी गायकवाड शफिल बिराजदार शरणबसव काणे यांनी क्रमांक मिळविला .प्रश्नंमंजूषामधे गायत्री गायकवाड बीबनबी बिराजदार अनम पटेल किशोर पात्रे अल्फीजा शेख सुप्रिया तोळनुरे भरत लकशेट्टी विघेश नरूने लक्ष्मी तोळनुरे खंडोबा मुलगे या विद्यार्थ्यानी भाग घेतला .गीतगायन मधे प्रतिक घुगरे चांद शेख अंकिता जमादार मयुरी तोळनुरे शिफा पटेल या विद्यार्थ्यानी भाग घेतला .हस्तकला स्पर्धेत संचिता महमद बिराजदार स्वाती तोळनुरे प्राची पंचाळ ऊक्सर शेख इत्यादी विद्यार्थ्यानी भाग घेतला .केंद्रप्रमुख श्रीहरी करपे यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करून बक्षीस देण्यासाठी व कार्यक्रम परिपत्रकाप्रमाणे घेण्याविषयी मार्गदर्शन केले .केंद्रप्रमुख मुर्डि आयूब यांनी कार्यक्रमाला अचानक भेट देऊन यशस्वी विद्यार्थ्याना बक्षीस दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूसिंग रजपुत यांनी केले तर रेखा सोनकवडे यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून आभार मानले .