*श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत भारतीय संविधान दिन उत्साहात संपन्न* .
वळसंग ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत भारतीय संविधान दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला.याप्रसंगी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य विरेश थळंगे व पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड भाषांध्ये संविधानाचे वाचन केले.या दिनाचे औचित्य साधून गीत गायन आणि प्राथमिक व माध्यमिक गटात मराठी, कन्नड व इंग्रजी या तीन भाषांमध्ये स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रत्येक भाषेतून तीन क्रमांक काढून त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी संविधान दिनाचे महत्त्व प्राचार्य वीरेश थळंगे यांनी सांगितले .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजयकुमार धनशेट्टी, सिदधाराम भैरामडगी ,बाळकृष्ण गुंड, निलकंठ कवटगी,सिद्धारूढ हिरेमठ ,बसवराज दुधगी,वीरेश थळंगे,संतोष कस्तुरे, विजय प्याटी, शिवराज अष्टगी,मल्लिनाथ गौडगाव,प्रा.शरणय्या मसुती ,विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी,स्नेहा हळगोदे, प्रतिभा तांडुरे, लिपिका राजश्री दुधगी,कर्मचारी कट्टेप्पा कोळी , विनोद दुधगी आदींचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार यांनी केले.
More Stories
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात
हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
संविधानामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल — मल्लिनाथ कल्याणशेट्टी