माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण (मुरूम प्रतिनिधी)
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, धाराशिव, राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २६) रोजी ७७ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी २६ /११ हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील मदन सुरवसे, सचिनसिंग ठाकूर यांनी सामुहिक संविधानाच्या उद्येशपत्रिकेचे वाचन केले. या दिनाचे औचित्य साधून यावेळी प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी संविधानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सतिश शेळके, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिला स्वामी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. शिवपुत्र कानडे, डॉ. सुजित मठकरी, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. अविनाश मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नरसिंग कदम, डॉ. विलास खडके, प्रा. अजिंक्य राठोड, सुरेखा पाटील, दत्तू गडवे, अमोल कटके, प्रजीत कांबळे, सोहन कांबळे, नितीन गजधाने, अमर गजधाने, दिनेश कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेंद्र गणापुरे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मानले. यावेळी विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा करताना प्राचार्य अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, सतिश शेळके, महेश मोटे, सायबण्णा घोडके, शिला स्वामी व अन्य.
More Stories
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात
हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
संविधानामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल — मल्लिनाथ कल्याणशेट्टी