
नाविंदगी (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील गौडगांव वस्ती मिनी अंगणवाडी शाळा आजही उघड्यावर आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी साधी पत्र्याची शेड सुध्दा या १० वर्षांमध्ये बांधली गेली नाही, त्यामुळे वस्तीवरील शाळा ही चक्क एका झाडाखाली भरत असल्याचे दिसून येत आहे.
महिला व बालविकास विभागाचे स्थानिक अधिकारीही या अंगणवाडीकडे फिरकत नाहीत. गौडगांव वस्ती शिवारात ३० ते ४० कुटुंबांच्या वस्त्या आहेत. तरीही ग्रामपंचायत देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे नाईलाजाने ही मुले एका झाडाखाली वर्षानुवर्षांपासून उघड्या अंगणवाडीत शाळा शिकण्यासाठी येतात. अंगणवाडीच उघड्यावर म्हटल्यावर मुलांसाठीचा आहार कोठे शिजवायचा हाही मोठा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या घरून आहार शिजवून तो चालत किंवा दुचाकीवर वस्तीपर्यंत आणतात. वस्तीवर आल्यावर मुलांना गोळा केले जाते. मग एका झाडाखाली ही अंगणवाडी भरते.
सदर शाळेसाठी ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक आणि तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आजपर्यंत याकडे दुर्लक्ष केलं आहे. संबंधित प्रशासनाच्या सहाय्ग्रायाने मपंचायतीकडून मिनी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
More Stories
भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा उत्साहात
हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
संविधानामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल — मल्लिनाथ कल्याणशेट्टी