भरड धान्य खा, अन् प्रतिकारशक्ती वाढवा..
बदलती जीवनशैली व योग्य आहाराच्या अभावामुळे आजाराचे वाढते प्रमाण ही एक समस्या बनत चालली आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/Grain-780x470.jpg)
भरड धान्य खा, अन् प्रतिकारशक्ती वाढवा..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
डॉ. प्रमोद फरांदे
बदलती जीवनशैली व योग्य आहाराच्या अभावामुळे आजाराचे वाढते प्रमाण ही एक समस्या बनत चालली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सातारा – बदलती जीवनशैली व योग्य आहाराच्या अभावामुळे आजाराचे वाढते प्रमाण ही एक समस्या बनत चालली आहे. ग्लुकोजसारखे घटक शरीरात अधिक प्रमाणात असणे हे वेगवेगळ्या आजारांस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते भरड धान्य (मिलेट्स) हे पोषण तत्त्वाचे आगार आहे. याचा आहारात समावेश केल्यास प्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी फायदा होतो. भरडधान्याचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्रसमितीने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही निवडक भरडधान्य व त्याचा आरोग्यासाठी होणारा फायदा…ज्वारी पोषण मूल्ये – प्रथिने- १०.४ %, कर्बोदके- ७२.६%, स्निग्ध पदार्थ- १.९%, खनिजे- १.६%फायदे – ग्लुटेनमुक्त, फायबर, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, जस्त, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, खनिजे व सूक्ष्म पोषण घटकरक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, पचनास हलकी, पोटाचे, त्वचेचे आजार कमी होतात. रक्ताभिसरण वाढवते, वजन कमी करते, हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, ऊर्जा पातळी सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारते.
नाचणीपोषण मूल्ये – प्रथिने- ७.३%, कर्बोदके- ७.२%, स्निग्ध पदार्थ- १.३%, खनिजे- २.७%फायदे – नाचणीमधील पोटॅशियममुळे मूत्रपिंड, हृदय व मेंदू उत्कृष्टपणे काम करतात. व्हिटॅमिन बी हे मेंदूच्या कार्यापासून ते निरोगी पेशी विभाजनापर्यंत उपयोगी, शरीराच्या कॅल्शिअम पूर्ततेसाठी उपयोगी, हाडाचे आरोग्य सुधारते, मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर, थकवा कमी करण्यास मदत, फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित, आतड्यासंबंधित आजार अथवा कर्करोगास आळा बसण्यास मदत. त्वचा, रक्त आणि अवयवांचे आरोग्य राखण्यास मदत.बाजरीपोषणमूल्ये – प्रथिने- ११.६%, कर्बोदके ६७.५%,स्निग्ध पदार्थ – ५%, खनिजे- २.३%फायदे – प्रथिने अधिक, ग्लुटेन फ्री असल्याने पचनास सोपेहृदयास सक्षम करते, फॉस्फरसचे उच्च प्रमाणात आढळते, त्यामुळे पेशींमधील ऊर्जा व खनिज पदार्थ साठविण्यास मदत होते. लोहाचे प्रमाण असल्याने हिमोग्लोबीन वाढीस फायदेशीरराजगिरापोषणमूल्ये – प्रथिने- ४३%, कर्बोदके- ३२%, स्निग्ध पदार्थ- ५%फायदे – पोटॅशियम व फायबर, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळते. संधिवात, सांधेदुखी, हृदयासाठी उपयोगी. ग्लुटेन फ्री फायबरमुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात असल्याने मायग्रेनसाठीही उपयुक्त.
राज्यात भरडधान्य मिशनसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ५० कोटी व स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे २०० अन्न प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत, तर इंडियन इन्स्टिट्यूट मिलेट रिसर्च सेंटर हैदराबाद यांच्या सहकार्यातून सोलापुरात मिलेट सेंटर उभारण्यात येत आहे.- विकास पाटील, संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय, पुणेव्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यासाठी सप्लिमेंटचा वापर केला जातो. भरडधान्याचा आहारात वापर केल्यास सप्लिमेंट घेण्याची गरजच लागणार नाही. शिवाय मिलेट्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे विकारही होणार नाही.- डॉ. रश्मी बांगले, सिनिअर रिसर्च फेलो, आय. सी. आर. भोपाळ
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)