समतेची व बंधुताची संदेश देणारी ही हुरडा पार्टी असून ते जोपासण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून बी.के. प्रतिष्ठान करीत असल्याचे गौरवोद्गार वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी काढले.*
बीके प्रतिष्ठान ने सामाजिक उपक्रमाबरोबर दरवर्षी कंटेहळी रस्त्यावरील बाबुराव मळा येथे हुरडा पार्टीचे आयोजन

अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*येथील तालुक्यातील शेत शिवारात रब्बी हंगामात एक पाऊस पडला की अख्खा हंगाम तगुन जातो या पावसाने मातीतील सुगंध आणि चिवटपणा शेतकऱ्यांना बळ देऊन जातो समतेची व बंधुताची संदेश देणारी ही हुरडा पार्टी असून ते जोपासण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून बी.के. प्रतिष्ठान करीत असल्याचे गौरवोद्गार वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी काढले.*

ते कंटेहळी रस्त्यावरील बाबुराव मळा येथे बी.के. प्रतिष्ठान आयोजित हुरडा पार्टी शुभारंभ प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे बोलत होते.

पुढे बोलताना महेश इंगळे म्हणाले डिसेंबर महिन्यात थंडीच्या मोसमात सायंकाळची वेळेत घर परिवारासह मित्र परिवाराबरोबर शेकोटीच्या कडेला बसून गरमागरम हुरड्या सोबत लसणाची चटणी तिळाचे चिवडा गुळ खोबऱ्याची चुरा शेंगाची चटणी फरसाण खाल्ल्याने एक वेगळीच मजा येतो. थोड्या वेळा नंतर थंडगार मठ्ठा पिऊन माणूस तृप्त होत असल्याचे सांगून बीके प्रतिष्ठान ने सामाजिक उपक्रमाबरोबर दरवर्षी कंटेहळी रस्त्यावरील बाबुराव मळा येथे हुरडा पार्टीचे आयोजन करत असून हे अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे बोलत होते.

याप्रसंगी प्राध्यापक शिवशरण अचलेरे प्रथमेश इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष खाजापा झंपले संतोष जमगे सराफ व्यापारी अंकुश केत मनोज इंगोले सुनील पवार ज्ञानेश्वर भोसले श्रावण कुंभार नितीन झंपले आकाश गुंजले संतोष स्वामी बंटी नारायणकर अरविंद पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
