यशदा,पुणे येथील कर्मचाऱ्यांनी घेतला अस्स्ल सोलापूरी हुर्डाचा आस्वाद ..
ड्रीम फौंडेशन व बसव संगम शेतकरी गट आयोजित
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230201_145902-780x470.jpg)
यशदा,पुणे येथील कर्मचाऱ्यांनी घेतला अस्स्ल सोलापूरी हुर्डाचा आस्वाद ..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
पुणे — यशदा पुणे यशवंतराव चव्हाण एकेडमी ऑफ डेवलपमेंट एडमिनिस्ट्रेशन येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच अस्स्ल सोलापूरी हुर्डाचा आस्वाद घेतला निमित्त होतं ड्रीम फौंडेशन व बसव संगम शेतकरी गट आयोजित कार्यक्रमात मा.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या विशेष सहकार्याने व काशिनाथ भतगुणकी सर पुढाकारांने यशदा येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोलापुरी शेंगा चटणी,शेव,फरसाण, मठ्ठा,गावरान बोर,डहाळे वर ताव मारत मनसोक्त पदार्थाचा आंनद घेतला.
यावेळी मा मल्लिनाथ कलशेट्टी यशदा उपमहासंचालक,मा मंगेश जोशी यशदा रजिस्टर,MSEB चे कार्यकारी अभियंता मा.भागवत थेटे,मा रवींद्र टापरे उद्योजक,मा.शंकरराव अक्कलकोटे व DRDO चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ अशोक नगरकर विविध क्षेत्रातील मान्यवर या छोटासा हुर्डा पार्टीस आवर्जून उपस्थित राहून ग्रामीण खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला.
अनेक मान्यवर व अधिकारी कर्मचारीनी आनंदाने भावना व्यक्त केल्या मा.कलशेट्टी सरांमुळे पहिल्यांदाच यशदा मध्ये अशा वेगळा कार्यक्रम होतं आहे.यामुळे कलशेट्टी सरांचा आभार व्यक्त केले.अनेक मंडळी पहिल्यांदाच सोलापूरी खाद्य संस्कृतीच आनंद घेत होते.
ड्रीम फौंडेशनचे प्रमुख संस्थापक मा.काशिनाथ भतगुणकी याचं मा.कलशेट्टी साहेबांनी सविस्तर परिचय करू दिला.त्याची धडपड जिद्दचा कौतुक केले.नुकतेच काशिनाथ भतगुणकी यानी दिल्ली व मुंबई येथे असेच सोलापूरी खाद्य पदार्थाचा मेजवानी आयोजित करण्यात आले होते.तिथे भरपूर चांगला प्रतिसाद मिळला आहे.
सोलापूर सर्व पदार्थाचा वेगळे ब्रँडिंग करण्याचा छोटासा प्रयत्न आहे असे हि मा.काशिनाथ भतगुणकी सरांनी सांगितले यावेळी ड्रीम फौंडेशन विद्यार्थी सह गावगाथाचे संपादक धोंडपा नंदे व सोमेश्वर वाडी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)