तीर्थक्षेत्र संगोगी येथे हुरडा महोत्सव संम्पन… विद्या,बुध्दी, धर्मापेक्षा शील हे सर्वश्रेष्ठ गुण होय -श्री गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी
तीर्थक्षेत्र संगोगी येथे हुरडा महोत्सव संम्पन...
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230121-WA0050-780x470.jpg)
तीर्थक्षेत्र संगोगी येथे हुरडा महोत्सव संम्पन…
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
विद्या,बुध्दी, धर्मापेक्षा शील हे सर्वश्रेष्ठ गुण होय -श्री गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी
अक्कलकोट.-
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
तीर्थक्षेत्र संगोगी बसवन येथे श्री कालिका भवानी कल्याणकारी संस्थांनकडून हुरडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.यावेळी श्री कालिकाभवानी कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प.पू. सद्गुरू श्री देविदास महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मुख्य अतिथी म्हणून हिरेजेवरगीचे मठाधिपती सद्गुरु श्री गुरुशांतलिंग महास्वामीजी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
हुरडा महोत्सवाची सुरुवात श्री कालिकाभवानी मातेला अभिषेक , पारंपरिक विधी व पूजनाने करण्यात आले.
या महोत्सवामध्ये हजारो भाविकांनी श्री मातेच्या दर्शनासाठी भाविक जमले होते. या महोत्सवामध्ये हिरेजेवर्गी चे मठाधिपती सद्गुरु श्री गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी बोलताना म्हणाले की, विदेश में विद्या धन हैं, संकट मे बुध्दी धन हैं, परलोक मे धर्म धन हैं, औंर शील सर्वत्र ही धन हैं, म्हणून मनुष्य जीवनमद्ये शील हे सर्वश्रेष्ठ गुण होय, असे आपल्या मनोगतातून म्हणाले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
हा हुरडा महोत्सव कुरुंड संस्थान पासून सुरू आहे, त्यावेळी श्री देविदास महाराज यांचे गुरुवर्य प. पू.श्री. सद्गुरु भीमाशंकर महाराज यांनी आपल्या शिष्यगणाना घेवून सुरुवात केली होती. आज प.पू.श्री देविदास महाराज यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने या महोत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हा महोत्सव या भागात मोठा समजला जातो, हे सर्व श्री कालिका भवानी मातेवर असलेल्या श्रदधेमुळे होत आहे. यावेळी पंचक्रोशितील शेतकरीबांधवांनी आणलेला हुरडा मंदिरासमोर भाजून व त्याबरोबर वांग्याची भाजी, खिर (सांजा) शेंगा चटणी, उसाचा रस, ज्वारी व बाजरीची भाकरीचा भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आले.
या महोत्सवावेळी उपस्थिती मान्यवर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,शिवराज म्हेत्रे, मिलन कल्याणशेट्टी,महेश शावरी, बाबासाहेब पाटील,बाळासाहेब मोरे, सुरेश हसापुरे,डॉक्टर पाटील, गुरुनाथ मसुती,महेश हिंदोळे,प्रदीप पाटील, राजशेखर लकाबशेट्टी,सदानंद भोसले,शरणप्पा पुजारी,डॉक्टर महादेव धुत्तर्गी, आदी मान्यवर व पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन मधू महाराज यांनी केले.