हिंदी ही एक बहुमुखी भाषा आहे. जी शतकानुशतके विकसित झाली आहे आणि विविध संस्कृती, धर्म आणि प्रदेशांनी तिच्यावर प्रभाव टाकला आहे – सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात हिंदी भाषा चे सर्वत्र प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वामी यांनी केले.

हिंदी ही एक बहुमुखी भाषा आहे. जी शतकानुशतके विकसित झाली आहे आणि विविध संस्कृती, धर्म आणि प्रदेशांनी तिच्यावर प्रभाव टाकला आहे – सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी
अक्कलकोट, दि.१८ -हिंदी ही एक बहुमुखी भाषा आहे. जी शतकानुशतके विकसित झाली आहे आणि विविध संस्कृती, धर्म आणि प्रदेशांनी तिच्यावर प्रभाव टाकला आहे. हिंदी साहित्य तिच्या विविध रूपांमध्ये आणि शैलींमध्ये ही विविधता आणि समृद्धता प्रतिबिंबित करत असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी केले.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने पीएम उषा प्रायोजित दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात ‘हिंदी साहित्याची तात्विक पार्श्वभूमी ‘ या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र च्या उद्घाटनप्रसंगी माजी प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, हैद्राबाद विद्यापीठाचे डॉ. विष्णू सरवदे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रय मुरूमकर ( मुंबई), भोपाळचे डॉ. लता अग्रवाल, डॉ. भगवान अधटराव,तेलंग महाविद्यालय हिंदी विभागाध्यक्ष डॉ. बाळासाहेब सोनवणे ( पुणे ), डॉ. दत्तात्रय मुरुमकर, डॉ. एस. डी. शिंदे, डॉ. एम. एन. गायकवाड, दझंझंऍडॉ. डॉ. जी. डी. बिराजदार, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धन्यकुमार बिराजदार, डॉ. जयप्रकाश दुडे, डॉ. पंडित बन्ने, संचालिका पवित्रा खेडगी, प्राचार्य डॉ. शिवराय अडवीतोट, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, चर्चासत्राचे संयोजक प्रा. विठ्ठल वाघमारे, डॉ.गुरुलिंगप्पा धबाले,पीएम उषा प्रायोजितचे मुख्य समन्वयक डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, नोडल अधिकारी प्रा. अप्पासाहेब देशमुख, नॅक समितीचे समन्वयक प्रा. संध्या परांजपे उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषण हिंदी चे विभाग प्रमुख तथा संयोजक प्रा. विठ्ठल वाघमारे यांनी केेले.

हिंदी ही जागतिक स्तरावर महत्त्वाची भाषा असल्याचे सांगून डॉ. इरेश स्वामी पुढे म्हणाले की,
हिंदी साहित्य भारतीय लोकांचा इतिहास, संस्कृती आणि मूल्ये आणि इतर संस्कृतींशी त्यांचा संवाद प्रतिबिंबित करते. हिंदी ही जागतिक महत्त्वाची भाषा आहे, कारण ती संवाद, शिक्षण, व्यवसाय आणि राजनयिकतेच्या संधी उघडते. म्हणून सर्वांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात हिंदी भाषा चे सर्वत्र प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वामी यांनी केले.

हैद्राबाद विद्यापीठाच्या हिंदी विभागाध्यक्ष डॉ. विष्णू सरवदे बोलताना म्हणाले की, हिंदी साहित्याची पार्श्वभूमी ७ व्या शतकात दिसू लागली, १० व्या शतकात ती अधिक प्रस्थापित झाली. या साहित्यात धार्मिक आणि तात्विक कविता, तसेच अवधी आणि ब्रिज यांसारख्या बोलींमध्ये लेखन होत होते. कबीर आणि तुलसीदास यासारख्या लेखकांनी या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले
आहे. हिंदी साहित्याची पार्श्वभूमी आणि बौद्ध दर्शन, वैदिक दर्शन, जैन दर्शन, सिख दर्शन, इस्लाम दर्शन, बसव दर्शन, नाथ तथा सिद्ध दर्शन, वारकरी दर्शन या सर्व दर्शनाविषयी सविस्तरपणे माहिती सांगितले.

प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. निलेश भरमशेट्टी व प्रा. दयानंद कोरे यांनी करून दिला. हिंदी विभागचे विद्यार्थिनी विजयालक्ष्मी कुंभार, कल्पना मडिखांबे, साक्षीत कोळी, नंदिनी मारनुरे, भाग्यश्री कोळी व पवित्रा जमादार यानी स्वागत गीत गायले.
या राष्ट्रीय चर्चासत्रात शंभर हून अधिक शिक्षक , संशोधक, विद्यार्थी, मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी सत्रात लातूरचे डॉ. एम. एन. गायकवाड यांनी बौद्ध दर्शन व जेऊर (करमाळा) येथील डॉ. पंडित बन्ने यांचे जैन दर्शन या विषयावर मार्गदर्शन झाले. आणि दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे डॉ. दत्ता मुरूमकर यांचे वैदिक दर्शन व चिंचवड पुणे येथील डॉ. बाळासाहेब सोनवणे यांचे सिद्ध तथा नाथ दर्शन या विषयावर मार्गदर्शन झाले.
सूत्रसंचालन प्रा. वैभव पाटील यांनी केले. तर प्रा. सिध्दाराम पाटील यांनी आभार केले.