राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या निवडीनंतर अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी ना. अजित पवार यांचा सत्कार
राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या निवडीनंतर अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी ना. अजित पवार यांचा सत्कार
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230703-WA0061-780x470.jpg)
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या निवडीनंतर अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी ना. अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-18.19.09_889e4579.jpg)
याप्रसंगी ना. अजित पवार यांनी म्हणाले कि, आमचे जेष्ठ नेते ८५ वर्षीय अप्पा आजही तरुणासारखे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असून, ही बाब उल्लेखनीय आहे. नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीवर दिलखुलास चर्चा ना.पवार यांनी केली. याबरोबरच शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वामी समर्थ सह.साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीस राज्य सरकारकडून मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यावेळी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील, स्वामी समर्थ सह.साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक मुलगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)