
दिंडूरसह पंचक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट : विरोधकांनी आजतागायत दिंडूरसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांना केवळ विकासाच्या गप्पा मारत झुलवत ठेवले, मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासात सार्थ ठरवीत दिंडूरसह पंचक्रोशीचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले
ते दिंडूर येथे श्री नागनाथ देवालय आणि श्री धानलिंगेश्वर देवालय येथे ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.
पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, विकासकामांमुळे या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास होणार असून, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच, भाविकांना दर्शन व इतर सेवा अधिक सुलभ होऊन परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. विश्वास आहे की, या विकासकामांच्या माध्यमातून आपली परंपरा व श्रद्धेचा वारसा जपला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी लक्ष्मीपुत्र मिरजे, बसवराज मिरजे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, अनिल सनगले, धानलिंग मिरजे, लक्ष्मण हुल्ले, श्रीशैल नरोळे, महेश बिराजदार, सुरेश गड्डी, बाबुराव करपे, मलकप्पा कोडले, अनिल बर्वे, बसवराज शास्त्री, रफिक मुल्ला, सागर कोळे, निंगप्पा टक्कलकी, चंद्रकांत घोडके, विठ्ठल हुच्चे, नागनाथ शिवयोगी, रामचंद्र पवार, परमेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



