गावगाथा
Breaking : हिंजवडीत टेम्पोला भीषण आग ; चौघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण गंभीर…
निगडी (प्रतिनिधी): हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
