रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा – सुहास पाटील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या
श्री स्वामी समर्थ रुग्णालयातील आरोग्य शिबिराचा घेतला हजारों स्वामी भक्तांनी लाभ
अक्कलकोट, दि.७:७:२५ (श्रीशैल गवंडी) श्री स्वामी समर्थांनी आपल्या देहरुपी अवतार कार्यातून अगाध लिलांनी अनेक रुग्णांना दिलासा देवून त्यांचे आजार बरे केले आहेत. आज त्यांचे आशिर्वाद स्वहाती घेवून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी देखील श्री स्वामी समर्थ रूग्णालय स्थापन करून रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा समजून येथे अनेक आरोग्य शिबीरे आयोजीत करीत आहेत ही सर्वसामान्य रुग्ण स्वामी भक्तांकरीता मोठी समाधानाची बाब आहे. या शिबीरांमुळे संबंधीत रुग्णांना स्वामी कृपेचे पाठबळ लाभत आहे, म्हणून ‘रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा’ असल्याचे मनोगत कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेचे कार्याध्यक्ष तथा निस्सीम स्वामी भक्त सुहास पाटील यांनी व्यक्त केले. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ रुग्णालयात देवस्थानच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबाराचे शुभारंभ स्वामी भक्त सुहास पाटील यांच्या शुभहस्ते स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सुहास पाटील बोलत होते. या आरोग्य शिबीरात स्थानिक रूग्णांसह महाराष्ट्रातून आलेल्या स्वामी भक्त रूग्णांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. प्रारंभी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या शुभहस्ते या आरोग्य शिबीरास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले डॉ.एस.हिप्परगी, डॉ.रोहीत कुंभार,
डाॅ.गजानन भोसले, डॉ.राहुल कारीमुंगी,
डॉ. दिपेंद्र हुली, डॉ.स्नेहा वेळापूरकर,
डॉ.राजेश मलंग यांचा मंदीर समिती व
श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वतीने
श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त विश्वस्त आत्माराम घाटगे, बाळासाहेब एकबोटे, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, सुनिल पवार, अंकूश केत, बाबा सुरवसे, अरविंद पाटील, श्रीकांत झिपरे, मनोज इंगुले, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते. हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्याकरीता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश पवार, रवि मलवे, दर्शन घाटगे, भिमा मिनगले, अप्पाशा मिनगले व सेवेकऱ्यांनी मनोभावे परिश्रम घेतले.
फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात आरोग्य शिबीर शुभारंभ प्रसंगी सुहास पाटील, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, आत्माराम घाटगे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!