ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर ; देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना गुढीपाडव्याची भेट

5 दशकानंतर अक्कलकोट बसस्थानकाची पुर्नबांधणी

अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर ; देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना
गुढीपाडव्याची भेट
5 दशकानंतर अक्कलकोट बसस्थानकाची पुर्नबांधणी
अक्कलकोट, ता.21:
अक्कलकोट तालुकावसीय ज्या अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी खूप प्रतीक्षा करीत होते त्याला आता मूर्त स्वरूप आले असून एकूण तीन मजली बसस्थानक उभारणी केली जाणार असून त्यासाठी एकूण 29 कोटी निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने मा.देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना गुढीपाडव्याची भेट मिळाल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट हि स्वामी समर्थांची पुण्यभूमी पण अक्कलकोट तालुक्याच्या एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रातील बसस्थानक
मात्र अवकळा प्राप्त झाली होती, जीर्ण झालेले बसस्थानक,गळणारे स्थानक, गलिच्छ आवार, मोकाट जनावरे व , पाण्याची सोय नाही, पुरेसे स्वछतागृह नाही, कँटीन नाही अशा एक ना अनेक असुविधेने ग्रस्त स्थानक , स्वामी भक्त व तालुकावासीय सतत असमाधान व्यक्त करत होते. मागील 20 वर्षा पासून सातत्याने जनतेतून मागणी होऊनही हा प्रश्न दुर्लक्षित राहिला ,याला कंटाळून शेकडो नागरिक आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे नवीन बसस्थानक मंजुरी विषयी सतत मागणी करत होते.
त्यांनी अक्कलकोट बसस्थानक एवढे भव्य दिव्य पद्धतीने मंजूर करून आणीन की पुढची कित्येक वर्षी फिरून बघायला नको असा शब्द दिला होता.अखेर त्यांचा दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला आणि तब्बल 29 कोटी रुपये आणि तीन मजली बसस्थानक आणि प्रचंड सोयीसुविधा अशा स्वरूपाचे बसस्थानक मंजूर करून आणून तालुकावासियात आनंद निर्माण केला आहे.या रक्कमेत होणारी कामे पुढीलप्रमाणे आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

बसस्थानक इमारत
तळमजला : 22 प्लॅटफॉर्म , भव्य प्रवासी प्रतीक्षालाय, वातानुकूलित प्रतीक्षालय, कॅन्टीन, वाणिज्यगाळे, प्रसाधनग्रह यासाठी एकूण 8 कोटी 60 लाख 40 हजार रुपये.
पहिला मजला : चालक वाहक विश्रांती गृह,अधिकारी आतिथ्यालय,डॉरमेट्री रूम यासाठी 3 कोटी 45 लाख 52 हजार रुपये.
दुसरा मजला: आतिथ्यालय यासाठी 3 कोटी 8 लाख 84 हजार
विद्युत काम : 1 कोटी 81 लाख 77 हजार 120 रुपये
फायरफायटिंग : 75 लाख 73 हजार 800 रुपये
भरावीकरण व काँक्रिटीकरण: 3 कोटी 60 लाख
लँडस्केपींग: 50 लाख
याशिवाय इतर अनेक बाबी यात अंतर्भूत आहेत. सर्व कामे मिळून एकूण 29 कोटी रुपये मंजूर आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

नवीन बसस्थानक प्रमुख वैशिष्ट्ये : दोन चाकी ,तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी वाहनतळ,
अकरा व्यापारी मोठे गाळे, आरक्षण कार्यालय, शिवनेरी, शिवशाही व शिवाई बस प्रतीक्षालाय, वाहक चालक विश्रांती गृह, हिरकणी कक्ष व महिला वाहक विश्रांती गृह, दुसर्‍या मजल्यावर 14 खोल्या, महिला व पुरुष अत्याधुनिक स्वछतागृह, सर्व सोयीने युक्त कॅन्टीन, कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी सुसज्ज केबिन यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रतिक्रिया
सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्याची व स्वामी भक्तांची वाढती संख्या विचारात घेता पुढील अनेक वर्षे निर्माणच होऊ नये असे सुसज्ज बसस्थानक आता 29 कोटी रुपये खर्चून निर्माण केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचे सहकार्य लाभले. मतदारांना दिलेला शब्द तंतोतंत पाळणे हेच युती सरकारचे वैशिष्ट्य आहे.एवढे चांगल्या कामात माझा हातभर लागतोय याचे मोठे समाधान आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button