शंकरलिंग प्रशालेच्या संस्कारातून विकास जाधव यांनी प्रशालेचे ऋण फेडले आहे – महेश इंगळे
वळसंगच्या श्री शंकरलिंग प्रशालेत विकास जाधव यांच्याकडून वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी महेश इंगळेंचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी)
वळसंग येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे
माजी विद्यार्थी विकास जाधव यांनी प्रशालेने दिलेल्या संस्काराचे ऋण शंकरलिंग प्रशालेत आपल्या वही वाटपाच्या उपक्रमातून फेडले असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी
महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. आज शंकरलिंग प्रशालेचे माजी विद्यार्थी विकास जाधव यांच्या वतीने प्रशालेच्या हुशार व होतकरू अशा सुमारे ८०० विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे २५५० वह्यांचे वाटप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्येची प्रथम आराध्य दैवत सावित्रीबाई फुले व श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती पात्र झालेले विद्यार्थी साईगंधा तानाजी जमादार व श्वेता सतीश वळसंगे या दोन्ही मुलींचे शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर प्रथमेश इंगळे, ट्रस्टीचे संचालक विश्वनाथ थळंगे, वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, शंकरलिंग देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, संचालक विश्वनाथ थळंगे, रमेश दूधगी, प्रकाश दुधगी, जयश्री जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरहू कार्यक्रमास या प्रसंगी सन २००५ या शैक्षणिक वर्षाचे माजी विद्यार्थी अनिल बर्वे, कल्लय्या स्वामी, बसवराज कोळी, हजरत कटरे, प्रज्वल कुर्ले, व्हनळे भुसणगी इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री तानाजी जमादार, बाळकृष्ण गुंड, सिद्धारूढ हिरेमठ, नीलकंठ कवटगी, विजयकुमार प्याटी, विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, सिद्धाराम भैरामडगी, बसवराज दूधगी, वीरेश थळंगे, कट्टेप्पा कोळी इत्यादी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत भोसले यांनी केले तर आभार गंगाधर बिराजदार यांनी मानले.

फोटो ओळ – श्री शंकरलिंग प्रशालेत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, विकास जाधव, ट्रस्टीचे संचालक विश्वनाथ थळंगे, वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, शंकरलिंग देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, संचालक विश्वनाथ थळंगे, रमेश दूधगी, प्रकाश दुधगी, जयश्री जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!