तालुक्यातील पहिल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुहूर्तमेढ कै.बाळासाहेब इंगळे यांनी रोवली – प्रा.नागनाथ जेऊरे
कै.कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालयातील अभिवादन सोहळ्यात प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी व्यक्त केले मनोगत.

तालुक्यातील पहिल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मुहूर्तमेढ कै.बाळासाहेब इंगळे यांनी रोवली – प्रा.नागनाथ जेऊरे

कै.कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालयातील अभिवादन सोहळ्यात प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी व्यक्त केले मनोगत.

अमोलराजे भोसले-प्रथमेश इंगळे यांच्या आदरांजली पुर्वक प्रमुख उपस्थितीत कै.बाळासाहेब इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या पुण्य स्मृती दिनानिमीत्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली.

अक्कलकोट (श्रीशैल गवंडी)-दि.१८/३/२५ तालुक्यातील विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, व उच्चशिक्षित झाला पाहिजे हे ध्येय स्वर्गीय बाळासाहेब इंगळे यांनी बाळगले होते. यासाठीच त्यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील पहिले तंत्र निकेतन स्थापन करण्यासाठी फार मोठे कष्ट घेतले आहे. आज सुमारे हजारो विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन देशातील विविध भागात उच्च पदावर कार्यरत आहेत. तालुक्यातील पहिल्या तंत्र शिक्षणाची मुहूर्त मेढ स्वर्गीय बाळासाहेब इंगळे यांनीच रोवली असे गौरवोदगार कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी काढले. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय बाळासाहेब इंगळे यांच्या नवव्या व स्वर्गीय उमेश इंगळे यांच्या तेवीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात स्वर्गीय बाळासाहेब इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास व स्वर्गीय उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर प्रा.नागनाथ जेऊरे बोलत होते. या पुण्यस्मरण दिनानिमीत्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, सचिव शाम मोरे, यांनीही
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र
प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रथमेश इंगळे, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, धाराशिवचे दिंडी प्रमुख पोपटराव भोसले, प्रा.शिवशरण अचलेर, मा.नगरसेवक शिवपुत्र हळगोदे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, अरुण जाधव, माजी मुख्याध्यापक सुरेश फडतरे, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे बाबासाहेब निंबाळकर, सदस्य संतोष जाधव-फुटाणे, मंगेश फुटाणे, डॉ.विपूल शहा, डॉ.हिरण्णा पाटील, डॉ.गिरीश साळूंखे, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.विक्रम पडवळकर, डॉ.आदीत्य कोतवाल, डॉ.ए.एम.शेख, संतोष पराणे, अमर पाटील, शैलेश राठोड, रामचंद्र समाणे, सोपानराव गोंडाळ, संभाजी फुटाणे, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, शिवशरण इचगे, सुरेश सूर्यवंशी, दीपक जरीपटके, नरसिंग क्षीरसागर, चंद्रकांत सोनटक्के, संजय बडवे, अंबण्णा भंगे, भागवत विभुते, राजू एकबोटे, बाबा सुरवसे, छोटू हत्ते, तम्मा शेळके, अप्पी मिनगले, शिवानंद कार्ले, नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, दत्तात्रय जगताप, विरुपाक्ष कुंभार, चंद्रकांत गवंडी, सुनिल नायकवडी, रवी मलवे, शैलेश राठौर, मुन्ना मालक राठौर, श्रीकांत मलवे, सुरेश वाले सर, प्रसाद पाटील सर, प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, गायकवाड सर, धनराज स्वामी, सुनिल पवार, शरणमठ विश्वस्त बसवराज आलमद, शाम कदम, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, दर्शन घाटगे, तुषार मोरे, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, आदीत्य गवंडी इत्यादींसह ज्ञात, अज्ञात नागरीकांनी या प्रसंगी उपस्थित राहून कै.कल्याणराव इंगळे यांना आदरांजली वाहिली. या पुण्यस्मृती दिनानिमीत्त कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे व प्रा.नागनाथ जेऊरे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक अमोल भावठाणकर सर, कंप्युटर विभाग प्रमुख सचिन गायकवाड सर, सिव्हील विभाग प्रमुख नितीन ग्राम सर, सचिन घाटगे सर, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रशांत देसाई सर, मेकॅनिकल विभाग प्रमुख विजय कोरशेट्टी सर, सागर लोणारी सर, अमृता ममनाबाद मॅडम, जहागीरदार मॅडम, बिडवे मॅडम, बिराजदार मॅडम, निंबाळ मॅडम, म्हेत्रे मॅडम, विजय पवार सर, रविंद्र नष्टे, उमेश सोनवणे, चित्तरंजन अगरथडे, पांचाळ सर, बंटी नारायणकर, विपूल कडबगांवकर, संदीप गोंडाळ, सचिन पाटील, धर्माधिकारी, तळवार, पडवळकर, मल्लीकार्जून गवंडी, धनंजय माने, लवटे मॅडम, रामदे, अरवतकर, शेखर मनगुळे यांनीही आदरांजली वाहून कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता परिश्रम घेतले. या पुण्यस्मरण दिनानिमीत्त तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने पोस्टर प्रेझेंटेशन, रक्तदान शिबीर, रांगोळी स्पर्धा, रक्त तपासणी शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. यापैकी रक्तदान शिबिरात १०३ रक्त दात्यांनी रक्तदान केले. रक्त तपासणी शिबीराचाही ४२ नागरिकांनी लाभ घेतला. पोस्टर प्रेसेंटेशन रांगोळी स्पर्धा इत्यादींच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांची छबी सादर केली. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमधील सहभाग पाहून व रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिराची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या सर्व आप्तेष्टांकरिता अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार प्रथमेश इंगळे यांनी मानले.

फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून अभिवादन करताना अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, शाम मोरे, प्रा.नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.
