मैत्रीदिनानिमित्त कुरनूर येथे केले युवकांनी वृक्षारोपण
माणसाचे दोन खरे मित्र ग्रंथ आणि वृक्ष
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230806-WA0080-780x470.jpg)
मैत्रीदिनानिमित्त कुरनूर येथे केले युवकांनी वृक्षारोपण
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-18.19.09_889e4579.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*माणसाचे दोन खरे मित्र ग्रंथ आणि वृक्ष*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
मैत्रिदिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्यावतीने कुरनूर येथील विजय वाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच सर्व युवकांनी विजय वाचनालयाची वाचक सभासद म्हणून नोंदणी केली.
तसेच गावातील युवक एकत्र येऊन वाचनालय सुंदर व देखणे व्हावे आणि वाचनालयात नवीन पुस्तके, टेबल, खुर्च्या, वीज, पाणी, व अन्य सुधारणा व्हाव्यात अशी मागणी युवकांनी व्यक्त केली. या मूलभूत मागणीला प्रतिसाद देत ग्रंथपाल हरिदास काळे यांनी येत्या काही दिवसात सर्व व्यवस्था करण्याची हमी दिली. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने विजय वाचनालयास राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट दिली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विश्वजीत बिराजदार आणि प्रा. डॉ. अमोगसिद्ध चेंडके यांची मनोगते झाली. डॉ. चेंडके म्हणाले की, ‘सुसज्ज ग्रंथालय ही काळाची गरज असून, वाचनालय नियमित उघडे ठेवले आणि वाचकांना सर्व आवश्यक सुविधा दिल्या तर वाचकांची संख्या निश्चितपणे वाढेल आणि त्यातून वाचनाची गोडी लागेल.’ अध्यक्ष विश्वजीत बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून वाचनालय अधिक सुंदर व समृद्ध कसे करता येईल याची मांडणी केली. तसेच वाचनालयाच्या संदर्भात कोणत्याही अडीअडचणी उत्पन्न झाल्यास राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आपल्या पाठीशी असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी विजय वाचनालयाचे ग्रंथपाल हरिदास काळे, श्री. अप्पू काळे, केदार मोरे, बाबासाहेब चौधरी, मनोज सुरवसे, लक्ष्मण केंगार, मुरलीधर बावडे, तानाजी मोरे, महेश निंबाळकर, अमोल काळे, शुभम चेंडके, मारुती खांडेकर उपस्थित होते.
बातमीला प्रसिद्धी दिल्याबद्दल धन्यवाद सर….
वाचनसंस्कृती आणि वृक्षारोपण हा विषय घेतला होता.