वाढदिवसानिमीत्त नागरिकांकडून महेश इंगळेंचा सत्कार
महेश इंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
(प्रतिनिधी अक्कलकोट, दिनांक १५ नोव्हे)-
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी
रोहित माढेकर, महेश माशाळे, हनुमंत गुल्लोळी, शेखर लोंढे, गोविंद मंद्रूपकर, नागेश बंदीछोडे, गणेश साळुंखे, तसेच
वटवृक्ष मंदिर विश्वस्त समिती तसेच कर्मचारी व सेवेकरी यांच्या वतीने देवस्थानच्या अतिथी कक्षात शाल, पुष्पगुच्छ देवून, केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी महेश इंगळेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हनुमंत गुल्लोळी यांनी महेश इंगळे हे व्यक्तीमत्व अत्यंत विनम्र स्वभावाचं, धार्मिक नेतृत्वाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय नेतृत्वाची कास सांभाळत चालणारी आहे. त्यांची ही सेवा तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळेच त्यांचा परिवार अक्कलकोट पुरता मर्यादित न राहता परदेशात देखील त्यांचा भक्त परिवार आहे. यापुढील त्यांचे जीवनकार्य जास्तीत जास्त स्वामी समर्थांची सेवा करण्यामध्ये व्यतीत होवो असे मनोगत व्यक्त करून वाढदिवसानिमीत्त व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसानिमीत्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त मंडळ, अरुणभाऊ लोणारी, तसेच शहरातील व्यापारी शिवपुत्र हळगोदे, प्रसाद पाटील सर, शिवशरण अचलेर, संतोष फुटाणे, चंद्रकांत सोनटक्के, ईरण्णा पाटील, अविनाश मडीखांबे, खाजप्पा झंपले मित्र मंडळ, अब्दूल शेख, अमर पाटील, गंगाधर मोरे, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, बंडेराव घाटगे, अब्दुल शेख, ज्ञानेश्वर भोसले, रवि मलवे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संतोष जमगे, प्रकाश सुरवसे, बिराजदार सर, जगताप सर, योगेश पवार, पी.आय.जितेंद्र कोळी, संतोष जाधव, प्रसाद पाटील सर, डॉ.शिवराया आडवितोटे, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, मंगेश जाधव, योगेश लोकापूरे, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, आदींसह अनेक नागरिकांनी महेश इंगळेंना विवीध माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी समाजातील सर्वांनीच आपल्यावरील व्यक्त केलेल्या प्रेमामुळे आपण सर्वांचे ऋणी असून या पुढेही आपणा सर्वांचे स्नेह असेच रहावे असे मानस व्यक्त केले.
फोटो ओळ – वाढदिवसानिमित्त सत्कार करताना रोहित माढेकर, महेश माशाळे, हनुमंत गुल्लोळी, शेखर लोंढे, गोविंद मंद्रूपकर, नागेश बंदीछोडे, गणेश साळुंखे व अन्य दिसत आहेत.