शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त
महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२५/०८/२५) –
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देव स्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गट तालुका नेते शंकर म्हेत्रे
यांच्या वाढदिवसानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी शंकर म्हेत्रे व प्रथमेश म्हेत्रे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. हा सत्कार समारंभ सोहळा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये संपन्न झाला. यावेळी बोलताना शंकर म्हेत्रे यांनी लाखो भाविकांसह आमच्या म्हेत्रे कुटूंबियांचे आराध्य दैवत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात महेश मालक इंगळे यांच्या हस्ते माझ्या वाढदिवसानिमीत्त सत्कार झाल्याने श्री स्वामी समर्थांचे कृपाछ्त्र माझ्या पाठीशी असल्याची जाणीव झाली आहे. मंदीर समितीच्या वतीने अशा प्रकारच्या सत्कार सोहळयांचे उपक्रम महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी हाती घेतल्या पासून भाविकांना श्री स्वामी कृपेचे उब व वरदहस्त पाठीशी असल्याचे समाधान भाविकांना लाभत आहे. या पार्श्वभुमीवर आज येथे माझा वाढदिवस साजरा होवून माझा सन्मान होणे माझ्या व्यक्तीगत आयुष्याकरीता अभिमानास्पद बाब आहे. माझ्या वाढदिवसानिमीत्त महेश मालक इंगळे यांनी व्यक्त केलेल्या प्रेमपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून सर्वांचे आपल्यावरील प्रेम असेच कायम राहावे अशी सदिच्छा व्यक्त करतो व या सन्मानाप्रित्यर्थ आभार व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश म्हेत्रे,
बाबासाहेब पाटील, मैनोदिन कोरबू, अस्लम कोरबू, रामचंद्र समाणे, रामा गद्दी सर,
दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – शंकर म्हेत्रे व प्रथमेश म्हेत्रे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, बाबासाहेब पाटील, मैनोदिन कोरबू, अस्लम कोरबू, रामचंद्र समाणे, रामा गद्दी सर, दर्शन घाटगे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!