भुरीकवठेयेथे श्री स्वामी समर्थ महाराज पोथी वाचन समाप्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला.
भुरिकवठे – येथील श्रावण महिन्यानिमित्त श्री कालिका देवी मंदिरात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे पोथी वाचन अखेरच्या दिवशी मोठ्या भक्तिभावात पार पडले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, प्रतिमेचे पूजन तसेच श्री कालिका देवी, ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी, वीर हनुमान व श्री चंद्रादेवी मंदिरातील देवतांना पूजन, पुष्पहार व नैवेद्य अर्पण करण्यात आले.
प्रवचनकार चंद्रकांत शिवराम पोतदार यांनी पोथीतील शेवटचा अध्याय वाचून कार्यक्रमाचा समारोप केला. त्यानंतर श्रींची आरती करून पोतदार दांपत्याचा भक्तांच्या वतीने पुष्पहार व आहेर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यावेळी गावातील महिला व ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. दररोज आरती, हरिपाठ व भजनाच्या कार्यक्रमात सौ. वंदना चंद्रकांत पोतदार, सौ. सविता संजय सोलापूर, श्रीमती कलावती सूर्यकांत गवसणे, धोंडाबाई चंदुराया सोलापूर, सौ. लक्ष्मीबाई बसवण्णा सोलापुरे, गुरुवर्य मठपती बाई, श्रीमती शांताबाई विठ्ठल कोळेकर, सौ. काशीबाई बसवण्णा कुंटोजी, श्रीमती गंगाबाई शिवराम पोतदार, श्रीमती मथुराबाई पंढरीनाथ पोतदार, सौ. सुनिता दिलीप पोतदार, सौ. शांताबाई शांतमला खुणे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गेल्या नऊ वर्षांपासून प्रवचनकार चंद्रकांत शिवराम पोतदार व संजय चंदुराया सोलापुरे यांच्या पुढाकाराने हे अध्यात्मिक कार्य सातत्याने सुरू आहे. यंदाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सोलापुरे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!