
*धामणगाव येथे आढळून आले दुर्मिळ भैरव पाद बळीपीठ*
नितीन अणवेकर यांचे संशोधन
सोलापूर
बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना दुर्मिळ उग्र “भैरव पाद”नरमुंड बळीपीठ आढळल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या इतिहास नवीन वळण मिळाले आहे. हे शिल्प यादव काळातील आहे.
इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर वैराग पासून अवघ्या 8 किलोमीटरवर असलेल्या धामणगाव येथे ऐतिहासिक सर्वे च्या निमित्ताने गेले होते त्यावेळी त्यांना हे उग्र भैरव पाद बळीपीठ शिल्प आढळून आले. त्यानंतर संशोधकांनी भैरव पाद शिल्प हे दक्षिण भारतीय शैव-लोकपरंपरेचे अत्यंत दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण शिल्प असल्याचे मत नोंदविले आहे
शिल्पाच्या मध्यभागी दगडी पादपीठाच्या पादुका असून चारही बाजूंवर कोरीव मुंडके आहेत त्या मध्ये तीन बाजूंना रेड्याची मुंडकी आहेत एका बाजूस मानवी नरमुंड कोरलेले आहे. काळ्या दगडावर कोरलेले हे शिल्प कालमानानुसार झिजलेले आहे त्यावर कोणतेही शब्द कोरलेले नाहीत पूर्वोत्तर भारतातील कामाख्या शक्तिपीठात आजही रेडा बळीची परंपरा आढळते. त्याचा दक्षिणेकडील लोकपरंपरेशी साधर्म्य दिसून येतो भैरव हा उग्र-शैव देव असून त्याचे प्रमुख अलंकार नरमुंडमाला आहेत. त्यामुळे धामणगावच्या शिल्पपटावर तीन रेड्याच्या मुडक्या बरोबर एक नरमुंड कोरलेले आहे त्यामुळे हे बळीपीठ महत्वाचे ठरते.असे अणवेकर यांनी सांगितले.
*राज्यातील एकमेव भैरव पाद शिल्प*
धामणगावच्या या शिल्पाचा परिसर भैरव संप्रदायाशी जोडलेला आहे. शाक्त-ग्रंथात भैरव हा ग्रामदेवतेचा रक्षक म्हणून “गावाबाहेर” बसतो, याचा प्रत्यय तुळजाभवानी च्या क्षेत्रातचार ही बाजूने ५० किलोमीटर परिघात भैरव मंदिरांचे प्रमाण जास्त आहे.. धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत भैरव आहे पानगाव, सुर्डी, सोनारी, माणकेश्वर, धारूर, अशा ठिकाणी भैरवाची मंदिरे वा मूर्ती आढळतात. काही ठिकाण आत्मबलिदान शिल्पेही आहेत. त्यामुळे धामणगावचे हे शिल्प सोलापूर जिल्ह्यात भैरव संप्रदाय परंपरेच्या सांस्कृतिक, धार्मिक व स्थापत्य इतिहासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरते. आज त्याचे संरक्षण व शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, कारण भारतात अशा प्रकारचे “रेडामुंडक व नरमुंडयुक्त भैरव पाद” अत्यंत दुर्मिळ आढळतात कर्नाटकात भैरवपाद आहेत परंतु महाराष्ट्रातील एकमेव आहे.पुराव्यांचा अभ्यास करता तीन रेड्यांची मुंडकी आणि एक मानवी नरमुंड मध्यभागी भैरवपाद याचे दुसरे उदाहरण सापडलेले नाही. ही मोठी उपलब्धी आहे. यामुळे हे शिल्प दुर्मिळ व उल्लेखनीय आहे.
विशाल फुटाणे
इतिहास व पुरतत्व संशोधक.
असे भैरव पाद शिल्पपट यापूर्वी मोहोळ गावातील निलकंटेश्वर मंदिराच्या समोर आढळून आले आहे. परंतू त्यावर नरमुंड नाही.गेल्या नाहिन्यात क्षेत्रीय भेटी दरम्यान धामणगावांत नागनाथ बारवाच्या मागील बाजूस एका झाडाखाली हे शिल्प उघड्यावर पडून असल्याचे दिसून आले.त्यावर एक मानवी नरमुंड आणि रेड्याचे तीन मुंडके दिसून आले. मध्यभागी भैरव पाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भैरव पाद शिल्पाच्या उपलब्धीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन परंपरेवर प्रकाश पडला आहे. या शिल्पाचे संवर्धन आणि संरक्षण होणे गरजेचे आहे..
HTML img Tag
नितीन अणवेकर
इतिहास अभ्यासक
सोलापूर




