गावगाथा

साखरपुडा ठरले लग्नाचे सोहळ्यात रूपांतर! आर्थिक परिस्थितीचा विचार करून नागेशी व तानवडे कुटुंबांचा अभिनव निर्णय

सामाजिक बांधिलकी

साखरपुडा ठरले लग्नाचे सोहळ्यात रूपांतर! आर्थिक परिस्थितीचा विचार करून नागेशी व तानवडे कुटुंबांचा अभिनव निर्णय

चपळगाव प्रतिनिधी
रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी शुभकार्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अक्कलकोट तालुक्यातील बऱ्हाणपूर व शिरवळ येथील दोन कुटुंबांनी समाजासमोर वेगळाच आदर्श ठेवला. साखरपुड्याचा मुहूर्त असतानाही, दोन्ही कुटुंबांनी तिथी न पाहता थेट विवाह सोहळा पार पाडत निर्णयाची नवी दिशा दाखवली.
बऱ्हाणपूर येथील परमेश्वर नागेशी यांची कन्या प्रिती हिचा साखरपुडा शिरवळ येथील विश्वनाथ तानवडे यांचे सुपुत्र संतोष याच्याशी ठरलेला होता. मात्र दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती व शेतीवर अवलंबून असलेली वाटचाल पाहता, अनाठायी खर्च, वेळ आणि शारीरिक कष्ट वाचवण्यासाठी साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह उरकण्याचा निर्णय घेण्यात आला.
महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना विवाहासारखी मोठी जबाबदारी पार पाडणे अवघड झाले आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सुचवलेल्या मार्गदर्शनातून आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह सोहळा साधेपणाने पार पडला.
या निर्णयामध्ये पुढाकार घेणाऱ्यांमध्ये विजय तानवडे, बसवराज तानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, सरपंच वर्षा भंडारकवठे, सिद्धाराम भंडारकवठे, राजू कोळी, राजू जवळगे, प्रशांत तानवडे, बसवराज बिराजदार, परमेश्वर बिराजदार, शिवा तानवडे, जाफर मुल्ला, अजित वदलुरे, विजय बिराजदार, निलप्पा तानवडे, कस्तुरी तानवडे, लक्ष्मी तानवडे, अजित तानवडे, संतोष भंडारे, शंकराचार्य मठपती, पंचप्पा चितळे, सरपंच गौस मुजावर, उपसरपंच पद्मसिंह बनसोडे, माजी सदस्य खय्युम पिरजादे, सैद पिरजादे, गफ्फार पिरजादे, माजी सरपंच कविता हाल्लोळे, अश्रफ अली पटेल, अब्दुलहमीद पिरजादे, शाम बंदिछोडे, रवि इरवाडकर, नागेश बऱ्हाणपूरकर, मानप्पा गूगळे यांचा मोलाचा सहभाग होता.
या निर्णयामुळे सादगी, सुज्ञता आणि सामाजिक जाणीव यांचा आदर्श घालून दिला आहे. समाजातील इतर कुटुंबांनाही या कृतीतून प्रेरणा मिळण्यासारखी बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button