No DJ! No DOLBY!
अक्कलकोटवाशियांनी घेतली शपथ!

सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद 2025 अनुषंगाने दिनांक 25/08/2028 रोजी 13/00 वाजता प्रियदर्शनी मंगल कार्यालय,कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे शांतता कमिटी, श्री गणेश मंडळ पदाधिकारी,पोलीस पाटील व डीजे डॉल्बी धारक यांची शांतता मीटिंग घेण्यात आली.
सदर मीटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,तसेच कोणतेही जातीय,धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, नो डीजे नो डॉल्बी संकल्पना राबविण्यात यावी, पारंपरिक वाद्याचा वापर करावा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर मीटिंग करिता मा आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी, मा.श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण, मा.श्री. विलास यामावर,उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट,मा.श्री.विनायक मगर,तहसीलदार अक्कलकोट,मा श्री राजू आडम, उप अभियंता एम एस ई बी,श्री. शैलेश जाधव,कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका, पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावार,पोलिस निरीक्षक श्री नामदेव शिंदे, सपोनि अनिल सणगले, सपोनि निलेश बागाव शांतता कमिटी सदस्य अमोलराजे भोसले, दिलीप सिद्धे,अविनाश मडीखांबे,चंद्रशेखर मडीखांबे,सुनील खवळे, नन्नू कोरबू, बाबा पाटील,संजय देशमुख,मल्लिनाथ पाटील,मल्लिनाथ महादेव पाटील,इरफान दावण्णा,मिलन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे,रत्नाकर गायकवाड, सद्दाम शेरीकर वगैरे शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी,पोलीस पाटील व डॉल्बीधारक हजर होते.

तसेच सदर कार्यक्रम दरम्यान आषाढी वारी पंढरपूर येथे बंदोबस्त असणारे पोलिसांना जेवणाकरिता अन्नदान करणारे श्री अमोलराजे भोसले यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमादरम्यान श्री दिलीप सिद्धे,राहुल रुई,बालाजी माशाळे, शुकूर शेख,श्री. विलास यामावर,श्री राजेंद्र टाकणे, मा.श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण व मा.आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत. कार्यक्रमाचे सांगता नो डीजे नो डॉल्बी या संदर्भात शपथ देऊन करण्यात आलेले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!