गावगाथा

परिवर्तनवादी संत चोखामेळा यांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘ चोखोबावाणी ‘या दिनदर्शिकेत….. प्रा. कमलेश खिल्लारे

दिनदर्शिका प्रकाशन

परिवर्तनवादी संत चोखामेळा यांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘ चोखोबावाणी ‘या दिनदर्शिकेत…..
प्रा. कमलेश खिल्लारे…

वारकरी संतांनी कायमच परिवर्तनवादी विचारांची मांडणी केलेली आपल्याला दिसते . त्यांनी आपल्या आचरणातून जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला..संत तुकाराम महाराजांनी संत चोखामेळा यांचे मंदिर देहू येथे बांधून समतेच्या मूल्यांचे आपल्या कृतीतून दर्शन घडवले, संत ज्ञानेश्वर , संत नामदेव , संत चोखामेळा ,संत तुकाराम ,संत गाडगेबाबा या संतानी सांगितलेंल्या परिवर्तनशील विचारांना तरुण पिढीने आचरणात आणल्यास समाजातील विद्वेषाच्या घटना कमी होऊन , समताधिष्ठित समाज व्यवस्था भक्कमपणे उभी राहिल.. परिणामी राष्ट्रीय एकात्मता बळकटी येइल असे विचार संत चोखामेळा जलाशय नामकरण प्रणेते व परिवर्तनवादी चळवळीतील संघर्षशील अन अभ्यासू कार्यकर्ते प्रा. कमलेश खिल्लारे यांनी संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने तयार केलेल्या “चोखोबावाणी दिनदर्शिका” प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी केले.. हा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संत चोखामेळा जलाशयाच्या काठावर आयोजित करण्यात आला होता…..

चोखामेळा अध्यासन केन्द्राचे सचिन पाटील यांनी आपले प्रस्ताविक करताना सांगितले की प्रा. कमलेश खिल्लारे यांच्या सहा वर्षाच्या संघर्ष अन त्यागामधुन संत चोखामेळा जलाशय नामांतर लढा पूर्णत्वास गेला..कमलेश सरांच्या या कार्याची दखल म्हणजेच हे भव्य चोखोबांचे जिंवत स्मारक आहे.. म्हणून या ठिकाणी आज संत चोखामेळा अध्यासन केंद्राने ” “चोखोबावाणी दिनदर्शिका ” प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत चोखोबांची स्मारकं या पुढे जर आपण उभे करत असु तर ते रुग्णालये , वाचनालय , शाळा , संशोधन केंद्र यासारखे समाजाला कायम उपयोगी पडणारी असली पाहिजेत.. संताची स्मारक कशी असावीत हे चोखासागराकडे पाहताना लक्षात येते अशी जिंवत स्मारक आपल्याला नक्कीच प्रेरणा देत राहतील असे विचार व्यक्त केले..शेतकरी नेते प्रकाश गिते,अभिनेता महेन्द्र खिल्लारे,प्रा. दिलीप सानप यांनीही या वेळी आपले विचार व्यक्त केले…
या प्रसंगी अनिस अध्यक्ष प्रदिप हिवाळे,प्रतिष्ठित व्यापारी रघुनाथ नागरे,शेतकरी नेते मधुभाऊ शिंगणे,श्रीमंत निकाळजे ,राम शिंदे,कंत्राटदार बाळुभाऊ शिंगणे,स्वाभिमानीचे जुल्फिकार भाई ,पत्रकार देवानंद झोटे,शेषराव चाटे,भगवान खराडे,पत्रकार ताहेरभाई उपस्थित होते…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button