जेऊर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे निष्ठावंत समाधान होटकर आघाडीवर
अक्कलकोट — जेऊर जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी समाधान होटकर यांचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत असून त्यांच्या उमेदवारीला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब तसेच विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक असून, अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून समाधान होटकर यांनी अनेक वर्षे संघटना बळकटीकरणासाठी काम केले आहे.
ते सध्या अक्कलकोट युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, सोलापूर युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व जिल्हा उपाध्यक्ष अशा महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. भारत जोडो यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत संघटना विस्तारास मोठे योगदान दिले असून विविध सामाजिक उपक्रमांमधून जनसंपर्क दृढ केला आहे.
यामुळेच जेऊर जिल्हा परिषद गटासाठी समाधान होटकर यांची उमेदवारी ‘पक्की’ मानली जात असून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाधान होटकर यांनी मतदारसंघात व्यापक भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्या तालुक्यातील सक्रिय कार्यशैलीमुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!