गावगाथा

*पंढरपूर नगरपरिषद निवडणुक स्वबळावर की आघाडी संदर्भात पंढरपूर येथे काँग्रेसची पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न*

राजकीय रणधुमाळी

*पंढरपूर नगरपरिषद निवडणुक स्वबळावर की आघाडी संदर्भात पंढरपूर येथे काँग्रेसची पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न*
सोलापूर- पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन सपकाळ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खा.प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषद निवडणुकी संदर्भात दि. 11 नोव्हेंबर रोजी सायं. पाच वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाडा येथे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पंढरपूर शहर निरीक्षक विजयकुमार हत्तुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली.
या बैठकी मध्ये निवडणूक संदर्भात संभाव्य उमेदवारांची मुलाखती घेण्यात आले. नगरपरिषद निवडणूकीत आघाडी झाली तर ठीक नाही स्वबळावर निवडणुका लढण्याचे बैठकीत ठरले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आवर्जून उपस्थित होते.आघाडी मध्ये काँग्रेस पक्ष सामील व्हावे असे आवाहन भालके यांनी केले.
पंढरपूर तालुका अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर म्हणाले पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून चांगले नियोजन करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याची सविस्तर माहिती दिली.
पंढरपूर शहराचे निरीक्षक विजयकुमार हत्तुरे यांनी सर्व उमेदवारांची माहिती घेऊन उमेदवारांच्या अडचणी बद्दल विचार विनिमय करून जास्तीत जास्त आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळावे यासाठी आग्रही भूमिका मांडले अन्यथा योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर लढावा लागेल अशी भूमिका मांडली.यासंदर्भात प्रदेशला अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस शहर निरीक्षक सुहास भवाळकर, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत मोरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर मामा फलटणकर, नागनाथ अधटराव,माजी अध्यक्ष अँड राजेश भादुले, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल कौलगे पाटील,माजी शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, समीर कोळी, प्रा. जिल्हा सचिव अशोक डोळ, पांडुरंग डांगे,माजी ओबीसी अध्यक्ष शिवाजी धोत्रे, एकनाथ माने संदीप शिंदे रणजीत पाटील गणेश माने, नागेश मिसाळ, शैलेश घोगरदरे, सुनील उत्पात, बाळासाहेब आसबे, मिलिंद अडवळकर, सागर कदम आदी इच्छुक उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button