जेऊर जिल्हा परिषद गटासाठी मुकेश (भुताळी) कांबळे इच्छूक
जेऊर – येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपचे कार्यकर्ते मुकेश (भुताळी) कांबळे हे इच्छुक उमेदवार म्हणून आघाडीवर आहेत.
मुकेश कांबळे हे सचिन दादा समर्थक म्हणून गेली अनेक वर्षे जेऊर परिसरात सक्रियपणे काम करत आहेत. २०१३ पासून त्यांनी शक्ती केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी निभावत गावोगावी पक्षाची मुळे मजबूत केली आहेत. त्यांनी पक्षाचा विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला जनसंपर्क व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.
जेऊर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. माजी आमदार महादेवराव पाटील व मल्लिकार्जुन पाटील यांच्या काळापासून येथे काँग्रेसचा मजबूत प्रभाव राहिला आहे. १९९२ वगळता आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कोणताही उमेदवार निवडून आलेला नाही. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. गावकऱ्यांमध्ये “मुकेश कांबळे यांच्या रूपाने यावेळी जेऊर गटात भाजपचा झेंडा फडकणार” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
२०१९ च्या निवडणुकीतही मुकेश कांबळे यांनी सचिन दादा पाटील यांच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी लोकांमध्ये व्यापक जनजागृती केली होती. दादांना उमेदवारी मिळावी आणि ते विजयी व्हावेत म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी साकडेही घातले होते.
२०१९ ते २०२५ या काळात मुकेश कांबळे यांनी गावात सुमारे ८० लाख रुपयांचा विकासनिधी आणून गटर, रस्ते, पिण्याचे पाणी, आणि दवाखाना अशा मूलभूत सुविधांची उभारणी केली. जिल्हा परिषदेतील विविध कामे असोत किंवा नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी, मुकेश कांबळे २४ तास जनसेवा करण्यासाठी तत्पर असतात.
८००० मतदार असलेल्या जेऊर गटात त्यांचा समर्थक वर्ग मोठा असून, विशेषतः युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे. सक्रिय, प्रामाणिक आणि विकासाभिमुख युवा नेता म्हणून ओळख असलेले मुकेश कांबळे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!