गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाकार्यातून समाज उन्नती — आमदार शंकरभाऊ जगताप यांची प्रशंसा

अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाकार्यातून समाज उन्नती — आमदार शंकरभाऊ जगताप यांची प्रशंसा

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले अन्नसेवा व स्वामींचे सेवाकार्य अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत महाराष्ट्राचे आमदार शंकरभाऊ जगताप (पिंपरी-चिंचवड) यांनी व्यक्त केले.

आमदार शंकरभाऊ जगताप यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली असता कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर मंडळाच्या विविध सेवा, सामाजिक कार्य आणि भक्तांसाठी सातत्याने चालणाऱ्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, एस. के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, राहुल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, महांतेश स्वामी, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button