राष्ट्रीय बाल दिनानिमित्त झोपडपट्टीतील मुलांना खाऊ वाटप; छोट्यांच्या चेहऱ्यावर बहरला आनंद
अक्कलकोट :
१४ नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसरातील शिक्षणापासून व शाळेपासून वंचित राहिलेल्या लहान मुलांना खाऊ वाटप करून आनंदाचा वर्षाव करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी बाल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त यंदा समाजातील कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलांना गोड-धोड पदार्थ देत छोट्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
क्रीम बिस्किट, केक, डेरी मिल्क चॉकलेट यांसारखे विविध खाऊ देऊन २५ ते ३० लहान मुलांना तसेच महिलांना हा आनंदाचा प्रसाद देण्यात आला. या उपक्रमासाठी मोहसीन मोकाशी, अब्दुल हनान अत्तार, रशीद खिस्तके, अकीब बागवान, मुबिन अन्सारी सर आणि सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या वेळी सोहेल फरास, मोहसीन मोकाशी, अब्दुल हनान अत्तार, रशीद खिस्तके, अकीब बागवान, मुबिन अन्सारी सर, अशरफ गोलंदाज, अल्ताफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
— सोहेल फरास, सामाजिक कार्यकर्ते, अक्कलकोट
Back to top button
×
No WhatsApp Number Found!