वृक्षारोपण

मैंदर्गीत छत्रपती प्रतिष्ठानने केले 1001 स्थानिक वृक्षांची लागवड

लोकसहभागातून 1001 स्थानिक झाडांचे रोपण करत महावृक्षलागवडीचा सर्वांसाठी आदर्शवत उपक्रम

मैंदर्गीत छत्रपती प्रतिष्ठानने केले 1001 स्थानिक वृक्षांची लागवड

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट – मैंदर्गी येथील छत्रपती प्रतिष्ठानने लोकसहभागातून 1001 स्थानिक झाडांचे रोपण करत महावृक्षलागवडीचा सर्वांसाठी आदर्शवत उपक्रम संपन्न झाला. अक्कलकोट-गाणगापूर रोडवरील मौनेश्वर मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन मैंदर्गीचे सुपूत्र असलेले सध्या प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकारी असलेले श्री. सिध्दारूढ कोलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले अवेळी होत असलेला पाऊस, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधायचा असल्यास स्थानिक वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    


मागील अनेक वर्षात अक्कलकोट तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे, यामुळे परिसरात असलेल्या वनसंपत्तीत कमालीची घट निर्माण झाली वनक्षेत्र ओसाड झाले अशीच परिस्थिती काही वर्षे राहिली तर पाणीटंचाईसारख्या अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल हि परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी मैंदर्गीतील छत्रपती प्रतिष्ठान कोरोना नंतर 1500 झाडे लावून त्याचे संवर्धनही केले तीच वृक्षलागवडीची परंपरा कायम ठेवत यंदाही 1001 स्थानिक झाडांची लागवड करून मैंदर्गीतील वृक्षसंपत्तीत भर घालण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिध्दारूढ कोलाटे (RTO), श्री.शिवचलप्पा मुन्नोळी (निवृत्त अभियंता), श्री राजू धुपद (कर्नाटक वनविभाग अधिकारी), मनोज देवकर (इको नेचर क्लब),सौ.जगदेवी उकली (मुख्याध्यापिका श्री शिवचलेश्वर हायस्कूल),सौ.प्रतिभा देवकर, हणमंत आलूरे( माजी उपनगराध्यक्ष),श्री सुभाष बंडे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी संजय नाशी,मल्लीनाथ गोब्बूर,विनोद गोब्बूर,धर्मराज नाशी,सुमित फुलारी,मल्लीनाथ सलगर,अनिल जुजगार, अक्षय जुजगार, प्रशांत सिदगुंडी,समर्थ नागूर, अनिल नागणसूर,सिद्धारुढ भंडारकवठे,अनिल बिराजदार,बसवराज सवळी,विशाल हिप्परगी,अमित देगील,सुनिल कोरचगांव,अप्पाशा हुलमानी,गुरुनाथ भंडारकवठे, चंद्रशेखर हुंचळगी,
शिवराज आळंद,भीमा हुलमनी,विरेश सोन्नद,शिवराज बिराजदार,सचिन करजगी,प्रदिप गवंडी,सागर बागेवाडी,अक्षय विभूते,राहुल विभूते,महेश डमामी तसेच मैंदर्गी नगरपरिषदेचे कर्मचारी प्रकाश मनिकडे, अमिर हमजा मुल्ला, बसवराज चिणमगेरी, सिध्दाराम नाटिकर,खाजप्पा दादानवरू,विठ्ठल पोतेनवरू,दिलावर मल्लेभारी आदींनी प्रयत्न केले. यावेळी सुत्रसंचलन संस्थेचे संस्थापक गणेश गोब्बूर यांनी केले तसेच आभार योगेश फुलारी यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button