श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

6 महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यात फिरून अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा अक्कलकोटमध्ये विसावली !

6 महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यात फिरून अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा अक्कलकोटमध्ये विसावली !

6 महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यात फिरून अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा अक्कलकोटमध्ये विसावली !

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि.: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 25 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे 26 वे वर्ष असून, 6 महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक 8 मे 2023 रोजी तीर्थक्षेत्र नगरीत सायंकाळी अन्नछत्र मंडळात विसावली आहे.
सोलापूरातून आगमन होताच श्रीक्षेत्र अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजय बाग पालखी विसावा येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेवून स्वागत केले. या बरोबरच विजयव्हिला या फार्महाऊस येथे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी दर्शन घेतले व पालखीचे पूजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आगमन होताच श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम आले. ते खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आमगन होताच फटाक्याची आतषबाजी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे पुजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुधवार पेठेतील समाधी मठ येथे चौलपपा यांचे वंशज उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सहवाद्य मिरवणुकीने पालखी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व पुरोहीत मंदार पुजारी हे उपस्थित होते. त्यानंतर अन्नछत्र मंडळात विसावली. यावेळी मंडळात विधिवत पूजन, आरती संपन्न झाली.
दरम्यान सदराची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात गेल्या 26 वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. याकाळात सुमारे 183 दिवसामध्ये 10 हजार कि.मी.चा प्रवास सुमारे 500 गावे महाराष्ट्रातील 35 जिल्हे व 75 तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील 2 जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, उस्मानाबाद, बिड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून मागणी होत आहे.
न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी पोहोचते, असे नियोजन अन्नछत्र मंडळाकडून करण्यात येते.
श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे.
श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्र मंडळाच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.
याप्रसंगी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबेर, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, पिट्टू सोनटक्के, वासु कडबगावकर, प्रविण देशमुख, वैजुनाथ मुकडे, प्रशांत माने, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, किशोर सुर्यवंशी, राजु नवले, शितल फुटाणे, मनोज निकम, वैभव मोरे, सौरभ मोरे, निखिल पाटील, रोहन शिर्के, रोहित खोबरे, अ‍ॅड.संतोष खोबरे, इंजि.अमित थोरात, कल्याणी देशमुख, लक्ष्मण शिंदे, पिट्ू साठे, गोविंद शिंदे, अनिकेत चव्हाण, संतोष बिराजदार, योगेश पवार, प्रथमेश पवार, किरण भोसले, विशाल कलबुर्गी, ऋषिकेश खराडे, वैभव कामनूरकर, भरत राजेगावकर, आतिष पवार, राहुल मोरे, राहुल शिंदे, प्रविण घाटगे, योगेश कुंभार, गोटू माने, सुनिल कारंडे, अक्षय पवार, दिनेश बंडगर, शुभम चव्हाण, फहिम पिरजादे, बाळासाहेब घाडगे,सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, रोहित निंबाळकर, आकाश शिंदे, आकाश गडकरी, श्रीशैल कुंभार, विकी गडदे, सिध्दु माळी, अप्पु घनाते, अप्पा सावंत, श्रीगुरव गुरव, गुंडू दुर्गे, शरद भोसले, संभाजीप पवार, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button