वृक्षारोपण

मंगरुळे प्रशाला अक्कलकोट चे माझी शिक्षक कै सिद्धप्पा बसप्पा इचगे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात

स्वर्गीय इचगे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वैशिष्ठ्यपुर्ण आदरांजली!

 स्वर्गीय इचगे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वैशिष्ठ्यपुर्ण आदरांजली!

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

मंगरुळे प्रशाला अक्कलकोट चे माझी शिक्षक कै सिद्धप्पा बसप्पा इचगे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रशालेच्या क्रीडांगणात एकशे एक प्रकारच्या विविध वनस्पती लावण्यात आले. या प्रसंगी मंगरुळे प्रशालेतील पन्नास विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.आणि तसेच कन्या प्रशालेतील खेळाडू विद्यार्थिनींना स्पोर्ट्स शूज देण्यात आले. यामध्ये कू. ज्योती बंन्ने, सुप्रिया विभुते,सोनाली काळीराम, शोभा बबलाद यांना शुज वाटप करण्यात आले.
प्रसंगी प्रमुख अतिथी हत्तीकणाबस मठाचे मठाधिपती परम पूज्य श्री प्रशांत महास्वामीजी, दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी महेश स्वामी साहेब, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुद्दे साहेब, प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील सर ,उपमुख्याध्यापक मल्लिनाथ पाटील फाऊंडेशन चे प्रमुख सुनील बिराजदार आदी जण उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वामीजींनी आपल्या हिंदू संस्कृतीत वृक्षाचे महत्त्व विशद केले. वृक्षा शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. हे प्रत्येक मनुष्याने निसर्गाची सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन स्वामीजींनी आपल्या मनोगतात केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

तसेच या प्रसंगी कै सिद्धप्पा बसप्पा इचगे सर यांच्या आठवणींना उजाळा देताना श्री सिद्धाराम पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक धडपडणारा शिक्षक व गणित विषयाचा आवडीचा असणारा शिक्षक होते व तसेच वर्गात शिकवताना तल्लीन होऊन,आपुलकीने,समाजाप्रती आपली असलेली कर्म भावना याची जाणीव ठेवून शिकवण्याचे काम करत होते.ते एकदा की वर्गात गेले की त्यांचे सर्वांग हे खडूने व्यापलेले असायचे. अशा या शिक्षकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी निसर्ग सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्तर देताना कै सिद्धप्पा बसप्पा इचगे सर यांचे सुपुत्र श्री प्रफुल इचगे यांनी आज घडीला माझे वडील जाऊन एक वर्ष झाले तरी असा एकही दिवस नाही गेला की वडिलांची आठवण झाली नाही.प्रत्येक दिवशी वडिलांची कमतरता भासत होता.माझी वडिलांची एक शिकवण होती. ते म्हणायचे तू,ते तो,ती हे प्रत्येक मनुष्य जीवनाचे सुत्र आहे.


तू म्हणजे तू स्वतः व्यवस्थीत राहिले पाहिजे. तो म्हणजे तो जगाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे. ते म्हणजे हे निसर्ग हे सर्व श्रेष्ठ शक्तिमान आहे.ती म्हणजे धरणी मातेची सेवा सर्व मानव जातीने केली पाहिजे.
अशा आठवणींना उजाळा देऊन वडिलांच्या समृतीला त्यांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे या सूत्रसंचालन श्री अभिजित लोके सर यांनी केले.
प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री सुनील बिराजदार,प्रमोद लोकापुरे, विद्याधर गुरव सर, रामेश्वर पाटील, धुळप्पा बजे सर, शंकर आलोणे,विश्वनाथ देवरमनी सर, सिद्धाराम मोगे, तात्या समाणे, नीलकंठ कापसे, शिवशरण इचगे, संपूर्ण इचगे कुटुंबीय, महिला प्रतिनिधी सौ वैशालीताई लोकापुरे, सुनीता ताई हडलगी, गुरुमाऊली मल्लम्मा पसारे मॅडम,माझी सरपंच वैशाली ताई चनशेट्टी,
सौ.शोभा पाटील, स्वप्नजा प्रफुल इचगे, प्राची बसवराज इचगे,कु आरोही प्रफुल ईचगे,
व शिवानंद पाटील,विलास कोरे, स्वामिनाथ आलदी,संतोष शिर्के, डॉक्टर सुनील बिराजदार,महेश जवळगी सर, माझी नगरसेवक राम समाणे,अभिमन्यू ताड साहेब, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत जीद्दीमनी सर, सिद्धाराम लाळशेरी,अरुण शिंदे,श्रीकांत आलदी, आनंद विभुते, अनिल बिडवे, प्रभाकर घिवारे ,सुरेश पाटील, सिद्धू आलदी, सुरेश हिरापूरे, राजकुमार एकबोटे, महेश लंगोटे, रघुनाथ कापसे, शिवाजी चौगुले, अंबण्णा पवार, चिदानंद बाबा,शिवानंद कार्ले,शरणु मुदगोंडा, रुद्राक्ष वैरागकार सर, श्रीशैल् पट्टद,विशाल पसारे, महेश पाटील,रेवणप्पा पाटील, शिवानंद पत्तरगी, बाबू रामदे,शीतल भरमशेट्टी, शशिकांत रंगदळ सर, रामलिंग शेरीकर, श्रवण भास्कर, प्रभू शाबादे,ओंकार पतंगे, चन्नबसप्पा शिंगे, विरूपाक्ष बिराजदार,वैजनाथ हळगोदे,जयसिंग यादव आदी फाउंडेशनचे सदस्य आदी जण उपस्थित होते .
#झाडे_लावा_झाडे_जगवा
#स्वच्छता_मोहीम
#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे_वनचरे
#वृक्षारोपण
#मंगरुळे_प्रशाला_अक्कलकोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button