जि,प,शाळेतूनच माझ्या शिक्षणाची सुरुवात.. DYSP विलास यामावार,
शिवम्मा प्रतिष्ठानच्या वतीने विलास यामावर यांचा सत्कार,
जि,प,शाळेतूनच माझ्या शिक्षणाची सुरुवात.. DYSP विलास यामावार,
शिवम्मा प्रतिष्ठानच्या वतीने विलास यामावर यांचा सत्कार,
चपळगाव प्रतिनिधी,
जिल्हा परिषद शाळेतूनच माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली असून तुम्हीही शिक्षणाच्या जोरावर यश संपादित करू शकता असे मनोगत उपविभागी पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी व्यक्त केले, शिवम्मा प्रतिष्ठान चपळगाव यांच्यावतीने त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी यामावर यांनी दहा वर्षे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचेही आवर्जून सांगितले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या,
याप्रसंगी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पो,नि,महेश स्वामी वळसंग पोलीस ठाण्याचे पो,नि,अनिल सनगले पो,नि,सतीश रणदरे यांची प्रमुख उपस्थिती होती,
याप्रसंगी उपस्थित सन्माननीय मान्यवरांनी शुभेच्छारुपी मनोगत व्यक्त केले,याप्रसंगी शिवम्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तमा भाऊ गजधाने उपसरपंच गणेश कोळी पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ तंटामुक्त अध्यक्ष कल्लाप्पा बडूरे माजी चेअरमन संजय बानेगाव ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजधाने जिल्हा परिषद मुख्याध्यापक सतीश वाले,