Pune : पुस्तकांशी मैत्री करा, स्वप्नं बघा, परंतु त्यासोबत एखादी कलाही जोपासा – एकनाथ आव्हाड
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-18.19.09_889e4579.jpg)
पुणे (प्रतिनिधी ): “पुस्तकांशी मैत्री करा, स्वप्नं बघा, परंतु त्यासोबत एखादी कलाही जोपासा.कलेमुळे जीवनाचा खरा आनंद तुम्हांला मिळेल वाचनाचा छंद तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवेल.” असे प्रतिपादन नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित पाहिले मराठी बालकुमार साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी केले. या प्रसंगी स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांनी मुलांनी रोजचे वर्तमानपत्रांचे वाचन करणं जरुरी आहे, हे आवर्जून सांगितले. तसेच माहिती, तंत्रज्ञान, सांस्कृतिक मंत्री मान. ॲड. आशिषजी शेलार यांनी आजची मुलं AI चा वापर करून माहिती मिळवतात ती माहिती खरी का खोटी कळत नाही. त्यामुळे विश्वासार्ह माहिती मिळविण्यासाठी पुस्तकांचे वाचन करणं गरजेचे आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
या एक दिवसीय बाल साहित्य संमेलनात कवी संमेलन, कथाकथन, बालनाट्य, नाट्यछटा अशा सर्व सत्रात मान्यवर आणि मुलांचा तसेच विविध शाळांचा सहभाग होता.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रशांत पाटील (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे), संजय बनसोड (जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर), जयु भाटकर (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), भानुदास केसरे (मुख्याध्यापक बी.पी.ई. शाळा), दिपक पडवळ (अध्यक्ष नॅशनल लायब्ररी, वांद्रे), अनुयोग विद्यालय चे संस्थापक सतीश चिंदरकर, प्रमोद महाडीक (प्रमुख कार्यवाह नॅशनल लायब्ररी, वांद्रे) बाल संमेलनाध्यक्षः मोनिका साकोरे, बाल स्वागताध्यक्षः ईशा आडिवरेकर उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.पी.ई शाळेच्या विद्यार्थिनी शर्मिन शेख, रिदा मणियार आणि लेखिका ज्योती कपिले यांनी केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)