![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240324-WA0049-780x470.jpg)
*’बार असो’ची निवडणूक एप्रिलच्या अखेरीस होणार*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २९ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्याचे बार असो.चे अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी अॅड. सुरेश गायकवाड यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रमामध्ये संघटनेची वर्गणी भरण्याची अंतिम तारीख २२ मार्च असून, त्यानंतर सलग तीन दिवस न्यायालयास सुटी असल्याने २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. २७ मार्च ते १ एप्रिलपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत. २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार
आहे. यानंतर ३ ते १५ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन अर्जाची विक्री व स्वीकृती करण्यात येईल. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १९ ते २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभा होणार असून, त्यादिवशी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)