गावगाथा

एसबीआय अक्कलकोट शाखेस वटवृक्ष देवस्थानचे नेहमीच सहकार्य -उपमहाप्रबंधक हरिषकुमार राजपाल

उपमहाप्रबंधक हरीशकुमार राजपाल व सोलापरचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

एसबीआय अक्कलकोट शाखेस वटवृक्ष देवस्थानचे नेहमीच सहकार्य -उपमहाप्रबंधक हरिषकुमार राजपाल

(श्रीशैल गवंडी, दि.२६/०६/२०२५.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भारतीय स्टेट बँकेच्या अक्कलकोट शाखेस नेहमीच सहकार्य असल्याचे मनोगत भारतीय स्टेट बँकेच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे उप
महाप्रबंधक हरिषकुमार राजपाल यांनी व्यक्त केले. आज भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी भारतीय स्टेट बँक अक्कलकोट शाखेस सदिच्छा भेट देऊन एसबीआय पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीच्या वतीने प्रथमेश इंगळे यांनी उपमहाप्रबंधक हरीशकुमार राजपाल व सोलापरचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी उपमहाप्रबंधक राजपाल बोलत होते.
या प्रसंगी लेखापाल ओंकारेश्वर उटगे,
मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे,
दर्शन घाटगे, विकास खडतकर, ओंकार पाटील, सुनिल हरहरे आदींसह भारतीय स्टेट बँक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ – उपमहाप्रबंधक हरीशकुमार राजपाल व सोलापरचे क्षेत्रीय प्रबंधक आनंदकुमार पाटकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button