गावगाथा

वटवृक्ष मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींच्या मासिक कीर्तनसेवेचा १२५ वा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा.

कीर्तन सेवेस मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या समवेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशीगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती.

वटवृक्ष मंदीरात डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींच्या मासिक कीर्तनसेवेचा १२५ वा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा.

कीर्तन सेवेस मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या समवेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशीगंधा वाड यांची प्रमुख उपस्थिती.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२४/०६/२०२५)
सद्गुरु चैतन्यस्वरूप अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार, प्रसार कार्याअंतर्गत पदयात्रा, जप, नामस्मरण, मानसपुजा, कीर्तन, भजन, गायन या सेवेत डोंबीवली-बदलापूरकरांच्या अध्यात्मिक उन्नती सोबतच उपस्थित स्वामी भक्त व सेवकांसाठी आध्यात्मिक मनोरंजनाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक कीर्तन सेवेचे आयोजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वामी हो” गृप आणि “डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळी” करत आलेले असल्याचे मनोगत डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळीचे प्रमुख सोमदत्त आसोलकर यांनी व्यक्त केले.
आज डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींच्या वतीने अक्कलकोट स्वामींच्या १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सवी मासिक कीर्तन सेवा ह.भ.प.सुधीर बाळ बुवा यांच्या नारदीय कीर्तन सेवेने संपन्न झाली. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदीर समितीच्या वतीने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार ह.भ.प.सुधीर बाळ बुवा तसेच प्रमुख सोमदत्त आसोलकर, चंद्रकांत ठाकूर मामा व डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळीचे प्रमुख सोमदत्त आसोलकर बोलत होते. पुढे बोलताना आसोलकर यांनी निवेदन उत्कृष्ट असेल तर कार्यक्रमाला अजुन रंगत येते याचा प्रत्यय आला. प्रविण भिरंगी आणि राजश्री भिसे यांनी खुप सुरेख निवेदन लिहिलं होतं. प्रिया आसोलकर व मनाली यांनी ते उत्तम प्रकारे सादर केले. नुतन, वैशाली,माई, सुचिता यांची गाणी आणि अदिती, दिपा, शिल्पा, सायली खरे हिच्या डान्स स्टेप्स उत्तम होत्या.अशा कार्यक्रमांमुळे प्रत्येकात असलेल्या छुप्या कलागुणांना वाव मिळतो आणि आपणच आपल्याला नव्याने समजतो. असे कार्यक्रम एक प्रकारचा आत्मविश्वास नकळत देऊन जातात आणि चाकोरीबद्ध आयुष्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढण्याची छान संधी उपलब्ध होते. या गायन, भजन आणि अध्यात्मिक नृत्य कार्यक्रमांमुळे बारा कलाकार पुढच्या कार्यक्रमांसाठी तयार झाले आहेत आणि कार्यक्रम ऐकून बघुन अजुन काही जणांना यात सहभागी व्हावंसं वाटेल हे नक्की. या सगळ्यांवर गायन आणि नृत्य शिक्षीका रेणुका पानसे हिने खूप मेहनत घेतली आणि बाराही कलाकारांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व कलाकारांचा व दरमहा येथे सेवा करण्याची संधी देत असल्याबद्दल मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे आभारी असल्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, खाजप्पा झंपले, महेश मस्कले, प्रसाद सोनार, विपूल जाधव,
रविराव महिंद्रकर, गणेश इंगळे, महेश काटकर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – कीर्तन सेवेच्या प्रारंभी स्वामी भक्त सोमदत्त आसोलकर, प्रिया आसोलकर व ह.भ.प.सुधीर बाळ बुवा यांचा सत्कार करताना महेश इंगळे, अभिनेत्री निशीगंधा वाड, सोमदत्त आसोलकर व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button