*लोककल्याणकारी राज्यकर्ते शाहू महाराजांना विनम्र अभिवादन*
श्रीक्षेत्र तीर्थ ता द. सोलापूर
श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर सोनकवडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्राचार्य यांनी शाहू महाराजांच्या राजकीय व सामाजिक कार्य विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडताना शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाल्याची प्रतिपादन केले.
यावेळी बहुसंख्य विद्यार्थी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!