ठळक बातम्याजिल्हा घडामोडी

Solapur : शरीरसंबंधासाठी नकार दिल्याने महिलेने तरुणाचा गुप्तांग कापला ; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Solapur rural

सोलापूर प्रतिनिधी दि.२४,  – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये चक्क महिलेनेच शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून तरुणांचे गुप्तांग कापल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

संबंधित महिलेशी शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने हे भयंकर कृत्य केल्याचे समोर आलं आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनंतर त्या महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरुण गुप्तांग कापल्याने जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जखमी तरुणाचे मोबाईलचे दुकान आहे. या दुकानांमध्येच त्या महिलेची आणि तरुणाची ओळख निर्माण झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघांचे प्रेमसंबंध जुळले. महिलेनं त्या तरुणाकडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र ती महिला अगोदरच विवाहित असल्याचे समजल्याने तरुणाने लग्नासाठी नकार दिला.

HTML img Tag Simply Easy Learning    

तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याने महिलेनं ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शेवटी याच प्रकरणात मार्च 2023 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्या तरुणाला दोन महिने जेलमध्ये काढावे लागले. तो दोन महिन्यांनी जेलमधून सुटून आल्यानंतर त्या महिलेनं त्याला ब्लॅकमेल करणं सुरूच ठेवलं होतं. तरुणाच्या वडिलांवर आणि भावांवर सुद्धा छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे हादरून गेलेल्या तरुणाने शेवटी ऑगस्ट 2023 मध्ये आळंदीमध्ये महिलेशी विवाह केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

विवाह केल्यानंतरही ती महिला सोबत राहत नव्हती. त्या महिलेनं पुन्हा दुकानात येत त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेला तो तरुण बार्शी तालुक्यातील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेला. त्यामुळे दोघांमधील संपर्क तुटला होता. मात्र 21 मार्च 2024 रोजी पहाटे पाचच्या सुमारास महिलेने सोशल मीडियावरून युवकाला फोन करून धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शीच्या एसटी स्टँडवर भेटण्यासाठी बोलावले.

HTML img Tag Simply Easy Learning    

तेथून ते दोघे समर्थ लॉजवरती भेटण्यासाठी गेले. यावेळी महिलेने त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे त्या महिलेने बळजबरीने त्याचे कपडे फाडून तोंडावर शर्ट टाकून थेट त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव झाल्याने बार्शीतील खासगी रुग्णालय त्याने गाठले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button