गावगाथा

टपाल तिकिटाच्या संग्रहाबद्दल किशोर चंडक यांना ‘फिला रत्न’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार सन्मान

टपाल तिकिटाच्या संग्रहाबद्दल किशोर चंडक यांना ‘फिला रत्न’ पुरस्कार प्रदान

सोलापूर : प्रतिनिधी

टपाल तिकीट संग्रहातील संशोधन, लेखन, प्रकाशन आणि निस्वार्थ सेवा याबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सोलापुरातील तिकीट संग्रह किशोर चंडक यांना फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडियातर्फे ‘फिला रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्राचे मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते पुणे येथे
प्रदान करण्यात आला.

मानपत्र, सन्मानचिन्ह, शेला आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडिया ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय फिलाटेलिक फेडरेशनशी संलग्न असून भारतीय टपाल विभागासोबत कार्यरत आहे.

याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग म्हणाले, आंतरराष्ट्रीय तिकीट संग्राहक किशोर चंडक यांनी १९६३ पासून भारताच्या पोष्टाचा इतिहास जपून ठेवला. त्याचा अभ्यास करून ७०० पानाचे पुस्तक काढले. तिकीटांवर अनेक माहीतीपुर्ण लेख लिहले, तिकीटाचा व त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यास मदत केली. मुलांमध्ये तिकीटे जमा करण्याचा छंद जोपासायला मदत केली आहे. भारतीय टपाल विभाग जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले हे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असेही मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी सांगितले.

तिकीट संग्राहक किशोर चंडक यांनी आजवर १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्ण व रजत पदके जिंकली आहेत. ते चार वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिप विजेता, आंतरराष्ट्रीय लार्ज सुवर्ण पदक विजेता राहिले असून फिलाटेलीच्या माध्यमातून देश-विदेशात भारताचे नाव उज्वल करणारा आदर्श संग्राहक ठरले आहेत.

याप्रसंगी पी. सी. आय. चे अध्यक्ष मधुकर देवगावका , जेष्ठ संग्राहक अशोक बयावाला , प्रतिसाद नेउरगावकर, श्रुति चंडक, नम्रता चंडक, वेदांत चंडक व संपूर्ण भारतातून आलेले अनेक तिकीट संग्राहक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button