चपळगाववाडी येथे वृक्षारोपण,निॅवृत विस्तार अधिकारी,ग्रामसेवकांचे सन्मान,व युवा उध्योजक सन्मान सोहळ्याने श्री.वंगे दामपत्याचे लग्न वाढदिवस नाविन्यपुर्ण उपक्रमाने साजरा
चपळगाववाडी येथे वृक्षारोपण,निॅवृत विस्तार अधिकारी,ग्रामसेवकांचे सन्मान,व युवा उध्योजक सन्मान सोहळ्याने श्री.वंगे दामपत्याचे लग्न वाढदिवस नाविन्यपुर्ण उपक्रमाने साजरा

चपळगाववाडी येथे वृक्षारोपण,निॅवृत विस्तार अधिकारी,ग्रामसेवकांचे सन्मान,व युवा उध्योजक सन्मान सोहळ्याने श्री.वंगे दामपत्याचे लग्न वाढदिवस नाविन्यपुर्ण उपक्रमाने साजरा
:- चपळगाववाडी येथे पर्यावरण व्यवस्थापन स्वंयसेवि संस्थे मार्फत वृक्षारोपण,निॅवृत विस्तार अधिकारी ,ग्रामविकास अधिकार्यांचे सन्मान,व युवा उध्योजिका सौ.अनिॅता ताई माळगे यांचा सन्मान सोहळ्याने
श्री.वंगे दामपत्यांचे जन्म व लग्न वाढदिवस सोहळा संपन्न झाला.
मा.श्री.महादेव कोळी साहेब,माझी ग.वि.अ.यांच्या अध्यक्षतेखाली
प्रमुख पाहुणे डाॅ. प्राध्यापक श्री.भिमाशंकर बिराजदार, डाॅ.प्राचार्य उमाकांत चन्नशेट्टी सर यांच्या शुभहस्ते
सेवानिवृत विस्तार अधिकारी, श्री.तुळजापुरे बी.एस,श्री.बिराजदार डि.बी.श्री.श्री.दहिवडे
एस,बी, ग्रामविकास अधिकारी श्री.स्वामी एस.आर.श्री.एल.बी.गळगुंडे यांचा वाचन साहित्य देऊन सन्मांन करण्यात आले.
तसेच सौ.अनिताताई माळगे युवा उध्योजक यशश्वीन अॅग्रोप्रोडुसर कंपनी यांचा
सौ.अंकलगे लक्ष्मीबाई सिध्दाराम सरपंच चपळगाववाडी यांच्या शुभहस्ते सन्मांन करण्यात आला.
सर्वप्रथम वृक्षारोपणाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.
प्रा.डाॅ.भिमाशंकर बिराजदार सर यांनी मार्गदर्शन करता
वृक्ष संवर्धन काळाची गरज असुन सदर उपक्रम पर्यावरण संस्थेमार्फत राबवुन समाजासमोर आदर्श ठेवल्पाचे नमुद केले.
प्राचार्य डाॅ.उमाकांत चन्नशेट्टी सरांनीॅ
वंगे फॅमीलीचा अभिनव उपक्रमांचे अभिनंदन करत या पुढे पर्यावरण संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग सहभाग घेत असल्याचे जाहिर केले.
सत्कारमुर्ती श्री.गळगुंडे तात्या यांनीॅ ग्रामसेवक संघटनेचे
जिल्हाध्यक्ष,राज्य कार्याध्यक्ष पदावरुन सहकारी बांधवावरील अन्यायाविरुध संघर्ष करत निर्भय मुक्त सेवा बजावण्या कामी सहकार्य केल्याचे नमुद केले.
श्री.तुळजापुरे बी.एस. यांनी कृषी विध्यालयापासुन आज अखेर एकञ पणे खेळीमेळीने कामकाज केल्याचे विषद केले.
सौ.अनिताताई माळगे यांनी महिला सशक्तीकरणास नारी शक्तीला साथ देत सामाजिक कार्यात अग्रेसर भुमिका बजावण्यास श्री.वंगे यांनी सहकार्य केल्यानेच मी यशस्वी उध्योजक म्हणुन उभी राहिल्याचे मनोगतात व्यक्त केली.
श्री.वंगे यांनी प्रस्तावनेत सामिजिक कार्यात अग्रेसर रहात पर्यावरण संवर्धनाची महत्व सांगत वृक्षारोपण कार्यात सर्व सभासद भाग घेणार असुन सामाजिक जाणीवेतुन संस्था आंतराष्टीय पातळीवर काम करणार असल्याचे सांगितले.
श्री.महादेव कोळी साहेब,माझी गटविकास अधिकारी प.स.अक्कलकोट यांनी अध्यक्षीय भाषणात नेपाळ दोर्यातील स्वच्छतेचा अनुभव कथन करत तेथिल संस्कृतीचा गौरव उदघार काढुन आम्ही भारतीयनागरिक त्याचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे विषद करत वृक्षसंवर्धन कार्यात संस्थेत सक्रिय राहणार असल्याचे जाहिर केले.
परिसरातील बहुसंख्य मान्यवर उपस्थीत होते.
सुञ संचालन श्री.महेश पट्टणशेट्टी सर यांनी केले.
उपस्थीतांचे आभार मानुन वाढदिवसाचे उत्साहात कार्यक्रम संपन्न झाल्याने आभार व्यक्त श्री.वंगे एस.जी.
मुख्यप्रवर्तक पर्यावरण व्यवस्थापन स्वयं सेवि संस्थेतर्फे मानले.
