अक्कलकोट तालुक्यात पूरग्रस्तांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची मदत
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सढळ मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून पूरग्रस्तांना डोअर टू डोअर फूड पाकीट वाटप करण्यात येत आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील गाव, वाड्या, वस्त्या व तांड्यांना गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाबरोबरच पुरपरिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये महसूल व पोलीस कर्मचारी मदतीसाठी सतत कार्यरत असताना तालुक्यातील एकमेव धार्मिक न्यास म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ तात्काळ मदतीसाठी पुढे आले आहे.
सोमवारी मोट्याळ गावाला पुराचा मोठा तडाखा बसल्याने अन्नछत्र मंडळाने त्वरित फूड पाकीट वाटपाची व्यवस्था केली. या प्रसंगी गावातील विनोद पवार, अनिल साळुंके, प्रमोद जंगाले, धनंजय काळे, राम काळे, बाळासाहेब जाधव यांच्यासह न्यासाचे सचिव शामराव मोरे, प्रवीण घाडगे, रोहन शिर्के, सिद्धाराम कल्याणी, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, श्रीशैल माळी, शहाजी यादव, खंडेराव होटकर, शिव काळे, रोहित कदम, शरद भोसले, नाम भोसले, महेश पाटील, शांतप्पा मठपती यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी व अमोलराजे भोसले मित्र परिवार उपस्थित होते.
👉 गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली ही सेवा कार्यवाही पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!