जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या वतीने :
एक दिवसीय अध्ययन शिबिराचे आयोजन
*सोलापूर*
जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी 9.30 वा. हत्तुरे वस्ती होटगी रोड येथील सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक सभागृहामध्ये लिंगायत समाज बंधावसाठी, लिंगायत धर्म इतिहास संस्कार, संघटना तत्व-सिद्धांत, लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा यांचे कार्य बद्दल *एक दिवसीय अध्ययन शिबिर* आयोजित केले आहे. असे जागतिक लिंगायत महासभा सोलापूरचे अध्यक्ष शिवानंद गोगव सांगीतले.
या शिबिर मध्ये प्रसिद्ध लिंगायत संशोधक विजयापुराचे विचारवंत डॉक्टर जे.एस.पाटील, लातूरचे डॉ. भीमराव पाटील, सोलापूरचे पत्रकार चनवीर भद्रेश्वर मठ या प्रसिद्ध वक्त्यांनी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
लिंगायत धर्मगुरू आळंद तोंटदार्य अनुभव मंटपाचे पूज्य कोरणेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात. सोलापूरचे प्रसिद्ध सरकारी प्रथम दर्जा कंत्राटदार माननीय परमानंद साहेब उद्घाटन करणार आहेत. एम के फाउंडेशनचे संस्थापक सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. सरकारी कंत्राटदार रेवणसिद्ध बिजर्गी,जागतिक लिंगायत महासभाचे राज्य अध्यक्ष राजशेखर तांबाके, राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, दक्षिण सोलापूरचे अमर पाटील, अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थितीत एक दिवसीय अध्ययन शिबिर होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील लिंगायत बांधवांनी या शिबिरामध्ये बहु संख्येने भाग घ्यावे. म्हणून जागतिक लिंगायत महासभा चे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, जिल्हा युवा अध्यक्ष बसवराज दिंडोरे आव्हान केले आहेत. या पत्रकार परिषदांमध्ये राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव शहराध्यक्ष राजेंद्र खसकी,जिल्हा युवा अध्यक्ष बसवराज दिंडोरे महीला अध्यक्षा राजश्री थळंगे ,जिल्हा सचिव शिवानंद मघे, जुळे सोलापूरचे अध्यक्ष जनबसप्पा गुरुभेट्टी, आदी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!