सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 13 मंडळात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. कोणत्या मंडळात किती पाऊस झाला याबाबतची माहिती पाहुयात.

अक्कलकोट तालूक्यातील वागदरी मंडळात तब्बल 137 मिमी तर किणी मंडळात 133 मिमी पावसाची नोंद
सोलापूर महापालिका क्षेत्रात असलेल्या शेळगी मंडळात देखील तब्बल 131 मिमी पावसाची नोंद
सोलापुरात झालेल्या अतिवृष्टी नंतर महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नंबर जाहीर
शहरातील नागरिकांना कोणतेही अडचण असल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष दूरध्वनी क्रमांक 02172735293 तर 18002331916 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या मंडळात अतिवृष्टी झाली?
शेळगी – 131 मिमी
मार्डी – 87 मिमी
बोरामणी – 65 मिमी
वळसंग – 116(मिमी)
होटगी – 125(मिमी)
अक्कलकोट – 116(मिमी)
जेऊर – 87 मिमी
तडवळ – 66मिमी
मैंदर्गी – 99 मिमी
वागदरी – 137 मिमी
चपळगाव – 116 मिमी
किणी – 133 मिमी
सोनंद – 65 मिमी

अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्यानं नागरिकांची तारंबळ
काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात घुसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर महामार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले.शहरातील 256 गाळा परिसरात पाणी शिरले आहे. ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी ड्रेनेज सफाईचे काम करताना या परिसरात दिसून येत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. मित्रनगर शेळगी भागात स्वतः आयुक्त ओम्बसे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पाहणी करत आहेत. दरम्यान, सोलापूर शहरात मागील 24 तासात 118.3 मिमी पावसाचे नोंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी 6:00 वाजता 4000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग 1500 क्युसेक होता. त्यामुळे बोरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
