HTML img Tag
वागदरीचे मुख्याध्यापक अनिल देशमुख सर जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

HTML img Tag
अक्कलकोट (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार यंदा वागदरी (ता. अक्कलकोट) येथील एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांना जाहीर करण्यात आला. अलीकडेच पार पडलेल्या विशेष सोहळ्यात देशमुख सरांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी देशमुख सरांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण क्षेत्रातील त्यांचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
या वेळी संघाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव बापू निळ, विद्या सचिव श्रीशैल पाटील यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे माजी चेअरमन मल्लिनाथ शेळके, ज्येष्ठ संचालक माणिकराव निलगार, भाऊराव पाटील, सिद्धाराम कलबुर्गी, निंगप्पा पटणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, प्राध्यापकवर्ग व देशमुख सरांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक, सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम आदर्शवत ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देशमुख सरांचा हा सत्कार म्हणजे केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण वागदरी व परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!